‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

By admin | Published: August 20, 2016 12:40 AM2016-08-20T00:40:17+5:302016-08-20T00:40:17+5:30

नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला

It is not a coincidence that the 'GAIL' company is closed | ‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

Next

अलिबाग : नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला आहे. हा योगायोग नक्कीच नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या मुद्यांवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असे द्वंद पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड हे गेली सात वर्षे या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आणि उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. आमदार लाड यांनी कलगुटकर यांना मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिल्याने आमदार लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु आमदार सुरेश लाड हे मारामारी करणारे अथवा तापट स्वभावाचे नाहीत, अशी क्लिन चीट आमदार जयंत पाटील यांनी दिली. आमदार लाड यांची भूमिका ही जनतेच्या आतला आवाज असावा, असेही त्यांनी सांगितले.
सध्याचे अधिकारी हे स्वत:च सरकार असल्यासारखे वागत असल्याने हे लोकशाहीला धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली. रिलायन्स कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. दाभोळ ते गुजरात अशी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अन्य उद्योगधंदे उभारण्यात येणार आहेत. बॉटलिंगचा प्लॅन्टही यामध्ये प्रस्तावित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षातच त्यांचा पैसा वसूल होणार आहे. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे.

शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे
1कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन एकदा ताब्यात घेतल्यावर तेथील जमिनीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे १५ फुटापर्यंत कोणतेच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
2रिलायन्सने अद्यापही आपला प्रकल्प अहवाल दिलेला नाही. किती जमीन जाणार आहे, किती शेतकरी बाधित होणार आहेत याची काहीच माहिती नाही. अलिबागमधील गेलचा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहे, तर दुसरीकडे रिलायन्सचा गॅस प्रकल्प अवतरत आहे. हा निव्वळ योगायोग नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज आहे.
3येत्या पंधरा दिवसांमध्ये शेकाप आपली रणनीती तयार क रेल. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून शेतकरी कामगार पक्ष यासाठी या विरोधातील आंदोलन तीव्र करुन शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी करण्यात येणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: It is not a coincidence that the 'GAIL' company is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.