शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

‘गेल’ कंपनी बंद पडणे हा योगायोग नाही

By admin | Published: August 20, 2016 12:40 AM

नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला

अलिबाग : नवरत्न कंपन्यांच्या यादीतील असणाऱ्या गेल इंडिया कंपनीचा गाशा जवळपास गुंडाळण्यात आला आहे, तर दुसरीकडे रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनचा प्रकल्प येऊ घातला आहे. हा योगायोग नक्कीच नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.कर्जत तालुक्यातील रिलायन्स गॅस पाइपलाइनच्या मुद्यांवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी असे द्वंद पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार सुरेश लाड हे गेली सात वर्षे या प्रश्नावर स्थानिक शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आणि उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांच्यात धक्काबुक्की झाली होती. आमदार लाड यांनी कलगुटकर यांना मारहाण केल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिल्याने आमदार लाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु आमदार सुरेश लाड हे मारामारी करणारे अथवा तापट स्वभावाचे नाहीत, अशी क्लिन चीट आमदार जयंत पाटील यांनी दिली. आमदार लाड यांची भूमिका ही जनतेच्या आतला आवाज असावा, असेही त्यांनी सांगितले. सध्याचे अधिकारी हे स्वत:च सरकार असल्यासारखे वागत असल्याने हे लोकशाहीला धोकादायक आहे. लोकप्रतिनिधींची प्रशासनावरील पकड कमी पडत असल्याने अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली असल्याची कबुलीही आमदार पाटील यांनी दिली. रिलायन्स कंपनी या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. दाभोळ ते गुजरात अशी पाइपलाइन टाकण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये अन्य उद्योगधंदे उभारण्यात येणार आहेत. बॉटलिंगचा प्लॅन्टही यामध्ये प्रस्तावित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षातच त्यांचा पैसा वसूल होणार आहे. कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे1कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाच्या चार पट नुकसानभरपाई दिली पाहिजे. शेतकऱ्यांची जमीन एकदा ताब्यात घेतल्यावर तेथील जमिनीच्या दोन्ही बाजूच्या सुमारे १५ फुटापर्यंत कोणतेच बांधकाम करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. 2रिलायन्सने अद्यापही आपला प्रकल्प अहवाल दिलेला नाही. किती जमीन जाणार आहे, किती शेतकरी बाधित होणार आहेत याची काहीच माहिती नाही. अलिबागमधील गेलचा प्रकल्प शेवटची घटका मोजत आहे, तर दुसरीकडे रिलायन्सचा गॅस प्रकल्प अवतरत आहे. हा निव्वळ योगायोग नसल्याने या प्रश्नाच्या तळाशी जाण्याची गरज आहे. 3येत्या पंधरा दिवसांमध्ये शेकाप आपली रणनीती तयार क रेल. शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान होत असून शेतकरी कामगार पक्ष यासाठी या विरोधातील आंदोलन तीव्र करुन शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आहे. या आंदोलनात सर्वांना सहभागी करण्यात येणार असल्याचेही आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.