सफाई कर्मचा-यांनी आपली घाण साफ करणे हे लाजिरवाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:04 AM2017-11-20T02:04:28+5:302017-11-20T02:04:31+5:30
माणगाव : सफाई कर्मचारी वर्ग असणे, आपण गावात घाण करतो ती सफाई कर्मचारी यांनी आपली घाण साफ करणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे
माणगाव : सफाई कर्मचारी वर्ग असणे, आपण गावात घाण करतो ती सफाई कर्मचारी यांनी आपली घाण साफ करणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे; परंतु सर्वांनी आपले जीवन सन्मानाने जागायला पाहिजे याचा विचार आपण करायला पाहिजे, असे वक्तव्य १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन कार्यक्र म प्रसंगी गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जिल्हा परिषद स्वच्छता विभागाचे अधिकारी जयंत गायकवाड यांनी काढले.
या वेळी गायकवाड यांनी जागतिक स्वच्छता दिनाचे महत्त्व सांगून आजची शौचालय व स्वच्छतेबाबत ज्वलंत परिस्थिती दाखवून दिली. तसेच महिलांना व शालेय विद्यार्थिनींना येणाºया मासिक कालावधीमध्ये वापरत असलेले सॅनिटरी पॅडचे, डिसपॉजल मशिनचे महत्त्व सांगून ते शाळा व महाविद्यालयात मशिन असाव्यात, असा आग्रह सरपंच व सदस्यांना त्यांनी केला.
या कार्यक्रम प्रसंगी जागतिक शौचालय दिनी गोरेगाव ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी महादेव अंबेतकर, दीपक साळवी, सुनंदा गोरेगावकर, अशोक मोरे, सुशील लोखंडे, गणेश कारेकर, प्रकाश झारी, दत्ताराम म्हशेळकर आदी सफाई व पाणीपुरवठा कर्मचाºयांचा सत्कार के ला. या वेळी स्वच्छता ठेवण्याबाबत शपथ घेतली.