माणगाव : सफाई कर्मचारी वर्ग असणे, आपण गावात घाण करतो ती सफाई कर्मचारी यांनी आपली घाण साफ करणे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे; परंतु सर्वांनी आपले जीवन सन्मानाने जागायला पाहिजे याचा विचार आपण करायला पाहिजे, असे वक्तव्य १९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन कार्यक्र म प्रसंगी गोरेगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जिल्हा परिषद स्वच्छता विभागाचे अधिकारी जयंत गायकवाड यांनी काढले.या वेळी गायकवाड यांनी जागतिक स्वच्छता दिनाचे महत्त्व सांगून आजची शौचालय व स्वच्छतेबाबत ज्वलंत परिस्थिती दाखवून दिली. तसेच महिलांना व शालेय विद्यार्थिनींना येणाºया मासिक कालावधीमध्ये वापरत असलेले सॅनिटरी पॅडचे, डिसपॉजल मशिनचे महत्त्व सांगून ते शाळा व महाविद्यालयात मशिन असाव्यात, असा आग्रह सरपंच व सदस्यांना त्यांनी केला.या कार्यक्रम प्रसंगी जागतिक शौचालय दिनी गोरेगाव ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी महादेव अंबेतकर, दीपक साळवी, सुनंदा गोरेगावकर, अशोक मोरे, सुशील लोखंडे, गणेश कारेकर, प्रकाश झारी, दत्ताराम म्हशेळकर आदी सफाई व पाणीपुरवठा कर्मचाºयांचा सत्कार के ला. या वेळी स्वच्छता ठेवण्याबाबत शपथ घेतली.
सफाई कर्मचा-यांनी आपली घाण साफ करणे हे लाजिरवाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:04 AM