जोरदार बरसणार; दोन दिवसांचा यलो अलर्ट!
By निखिल म्हात्रे | Published: June 20, 2024 09:24 PM2024-06-20T21:24:15+5:302024-06-20T21:24:23+5:30
लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत ...
लोकमत न्युज नेटवर्क
अलिबाग - सध्या जिल्ह्यात काही भागात सकाळ पासूनच पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी ये-जा करीत रिमझीम पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तर कोळी बांधवांनी जाळी विनण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात दोन दिवसाचा यलो अर्लट असून पुढचा एक दिवस ग्रीन अर्लट आहे.
मागील काही दिवस ऊन पाऊस पडत होता, त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र मागील पाच दिवसापासून पाऊस चांगलाच बरसल्याने सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.
तर काहीनी भात पेरणी केल्यावर काहींनी भात रोपाला पाणी देऊन भाताच्या रोपटे वाढविले होते. काही ठिकाणी भात पेरलेल्या ठिकाणची बेननी काढण्याच्या कामांनाही वेग आला आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, नागोठणे, खोपोली, पेण या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
भात पेरणीसाठी ज्या पावसाची अपेक्षा बळीराजाला होती. तसा पाऊस मात्र पडत नव्हता. पण, मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे बळीराजाला ज्या दमदार पावसाची अपेक्षा होती. तो, पाऊस गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून, आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.