मुरु ड समुद्रात ‘जय मल्हार’ बोट बुडाली, सर्व खलाशी सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:18 AM2017-08-06T00:18:55+5:302017-08-06T00:19:00+5:30
मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही
आगरदांडा : मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही बोट मुरु ड समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. किनाºयापासून दीड किमी अंतरावर बोट पोहोचली असता, वादळी लाटांनी अचानक बोट बुडू लागली.
बोटीमधील अमोल जंजिरकर, अरपेश जंजिरकर, भालचंद्र मकु, नितीन केंडु, नरेश वाघरे, नकेश पावसे, बाळू पाटील, ललित आगलावे, बाळकृष्ण आगलावे हे सर्व खलाशी यांनी समुद्रात उडी मारून किनारी आले. मात्र, तोपर्यंत ती बोट समुद्रात पूर्णत: बुडाली होती. येथील कोळी व भंडारी समाज बांधवानी सर्व एकत्र येऊन समुद्रात उड्या मारून दोरखंडाच्या सहाय्याने बोट खेचून बाहेर आणली. मात्र, या अपघातात लाखो रु पयांची जाळी व इतर वस्तुंचे नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.
ओहटी असल्याने, तसेच खाडीमध्ये प्रचंड गाळ असल्याने, मच्छीमारांना नौका खाडीतून चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे बोटीला काढण्यास ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ग्रोयस बंधारा असता, तर ही घटना घडली नसती. सरकारने या ठिकाणी ताबडतोब ग्रोयंस बंधारा बांधवा, अशी मागणी कोळी बांधवाकडून होत आहे.
‘जय मल्हार’ बोटीनेच दोन वर्षांपूर्वी बुडालेल्या १४ विद्यार्थांना शोधण्याचे काम केले होते. एकदरा गावातील कोळी व भंडारी बांधव, सागर कन्या मच्छीमार सोसायटी, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे सर्व कोळी बांधव यांनी सहकार्य केले. सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले व मनोहर मकु यांनी ग्रोयंस बंधरा बांधण्यासाठी मेरीटाइम बोर्डाकडे अनेक वेळा निवेदन दिले.