जांभूळपाडा, व-हाड पुलाची गंभीर दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:48 PM2018-09-07T23:48:37+5:302018-09-07T23:48:46+5:30
वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील हाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे.
- विनोद भोईर
राबगाव /पाली : वाकण-पाली-खोपोली राज्यमहामार्ग प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर पाली व वºहाड, जांभूळपाडा असे तीन महत्त्वाचे नदी पूल असून यातील वºहाड येथील पुलाची आजमितीस प्रचंड दुरवस्था झाली आहे. जुने बांधकाम असल्याने व सद्यस्थितीत जुना व जर्जर झालेला हा पूल केव्हाही कोसळून सावित्री पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. पाली-खोपोली मार्गावर असलेला वºहाड येथील पूल अनेक गावांसह मुंबई, पुणे व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा दुवा मानला जातो. सद्यस्थितीत पाली-खोपोली मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वºहाड येथील पुलाला आधार देणारे खांब मोडकळीस आले असून त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत.
पुलाच्या स्लॅबच्या ठिकठिकाणी शिगा निघाल्या आहेत. संरक्षण कठडेदेखील तुटून नदीत पडले आहेत. त्यामुळे वेगवान वाहन थेट नदीत कोसळून जीवघेणा अपघात होण्याची भीती वाढली आहे. वºहाड-जांभूळपाडा पुलावर लहान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविताना एक वाहन दुसऱ्या वाहनावर आदळून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अंबा नदीत पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. त्याचबरोबर या पुलावरु न अवजड वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे वेळीच या पुलाची दुरु स्ती झाली नाही तर कधीही हा पूल कोसळू शकतो अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खोपोली, पुणे, मुंबई येथील औद्योगिक प्राधिकरण आणि विळे भागाड, महाड, रोहा आणि दक्षिण कोकणातील औद्योगिक प्राधिकरण येथील विविध कारखाने, कंपन्यांमध्ये मालाची ने-आण करण्यासाठी होत असलेली अवजड वाहनांची वाहतूकदेखील याच मार्गावरु न चालते. त्यामुळे शासनाने वेळीच या गंभीर बाबीकडे लक्ष देवून पुलाची दुरु स्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.