जासई प्रकल्पग्रस्तांनी अतिक्रमण पथकाला लावले पिटाळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 12:37 AM2020-10-04T00:37:01+5:302020-10-04T00:37:18+5:30
जासई येथे उरण-बेलापूर रेल्वे अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईसाठी शनिवारी (३) सिडकोचे अतिक्रमण पथक आले होते.
उरण : जासई प्रकल्पग्रस्तांना सिडको, जेएनपीटी, रेल्वे, एनएचएआय यांनी दिलेल्या आश्वासनांची आधी पूर्तता करा, त्यानंतरच कारवाई करा, अशी तंबी देऊन शनिवारी जासई प्रकल्पग्रस्तांनी सिडकोच्या अतिक्रमण पथकाला पिटाळून लावले.
जासई येथे उरण-बेलापूर रेल्वे अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईसाठी शनिवारी (३) सिडकोचे अतिक्रमण पथक आले होते. न्हावा शिवडी सागरी सेतू प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, मेघनाथ म्हात्रे, जितेंद्र पाटील आणि इतर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांना जागेवरच रोखून जाब विचारला. साडेबारा टक्के भूखंडाचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. २०१४च्या एमटीएचएल कराराची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. गावठाण विस्ताराचा प्रश्न अजून सोडविला नाही. गाव नागरी सुविधांचा प्रश्न तसाच पडून आहे. आताचा साडेबावीस टक्के भूखंडाचा प्रश्न अनुत्तरित आहे. घोषणा केलेले साडेबावीस टक्के भूखंड आम्हा प्रकल्पग्रस्तांना कुठे आणि केव्हा देणार, हे पहिल्यांदा सांगा आदी प्रश्न पथकातील वरिष्ठांना विचारले.