शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे पूल ढासळतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 1:16 AM

श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी दुपारी पुलाची पाहणी केली आहे.

श्रीवर्धन : तालुक्यातील जावेळे नदीवरील जुना पूल ढासळत आहे. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णत: थांबविण्यात आलेली आहे. श्रीवर्धन पंचायत समिती सभापती बाबुराव चोरगे यांनी मंगळवारी दुपारी पुलाची पाहणी केली आहे.श्रीवर्धनला आॅगस्टमध्ये निरंतर एक आठवडा जोरदार पाऊस पडलेला आहे. जावेळे पुलाची बांधणी जावेळे नदीवरती करण्यात आलेली आहे. पुलाचे बांधकाम अंदाजे चाळीस वर्षांपूर्वीचे असावे, असे स्थानिक नागरिकांकडून समजले. पुलाची बांधणी ही दगडी स्वरूपात असून, वरच्या बाजूस सिमेंट व लोखंडाचा वापर केल्याचे दिसून येत आहे, तसेच पायथ्याच्या कामकाजासाठी दगड व इतर साहित्याचा वापर केलेला आहे. पुलाची लांबी अंदाजे २० फूट रुंदी १४ फूट व खोली अंदाज १८ फूट आहे. पुलाच्या दुतर्फा सिमेंटचे एक फुटाचे संरक्षक कठडे बांधण्यात आलेले होते.पुलावरती पावसामुळे दोन्ही बाजूला अंदाजे सहा इंचांपेक्षा जास्त उंचीचे गवत उगवलेले आहे. पुलाचा आधार असलेल्या तीन संरक्षक भिंतींपैकी एक संरक्षक भिंत ढासळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीवर्धन तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे मनोहर सावंत या व्यक्तीने संबंधित घटनेची माहिती सोमवारी सायंकाळी कळवली होती. त्यानंतर, श्रीवर्धन तहसीलदार यांनी तत्काळ दखल घेत पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.जावेळे पुलावरून वडशेत वावे, धारवली, आडी कोलमंडला, साखरोने, कारवीने या गावांचे दळणवळण चालते. मात्र, आजमितीस कोणतेही अवजड, वाहन पुलावरून गेल्यास अपघात होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. श्रीवर्धन पोलीस दलाकडून पुलाच्या दोन्ही मार्गांवर पूल वाहतुकीस बंद असल्याबाबत मार्गरोधक लावण्यात आलेले आहेत.पुलाच्या खालून जावेळे नदीचा प्रवाह जोरात वाहत आहे. नदीचे पात्र दोन्ही बाजूस विस्तारित स्वरूपाचे आहे. पुलाच्या बरोबर मध्यभागी काही अंशी पूल खचलेला निदर्शनास येत आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो. साखरोने, धारवली, आडी या गावातील लोकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे झाले आहे. दुचाकीस्वार किंवा पादचारी पुलावरून जाऊ शकतो. मात्र, कोणतेही चारचाकी वाहन पुलावरून गेल्यास अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे.>शिवभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागणारजावळे गावातील स्वयंभू शिव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील विविध भागांतून लोक दर्शनासाठी जातात. मात्र, जावेळे पुल क्षतिग्रस्त झाल्यामुळे तालुक्यातील शिवभक्तांना दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. पंचायत समिती सभापती बाबुराब चोरगे, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जावेळे सरपंच व ग्रामस्थ यांनी पुलाची पाहणी केली आहे.