अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:16 AM2020-01-09T03:16:13+5:302020-01-09T03:16:19+5:30

टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.

Jayant Patil's resolve to take Alibaug globally | अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प, जयंत पाटील यांचा मनोदय

Next

अलिबाग : एका छोट्याशा खेड्यात प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू करून आज थेट टांझानिया देशात उद्योग सुरू करून सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवण्याची किमया शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. समाजकारण, राजकारण, सहकार अशा क्षेत्रात आपल्या कामाची छाप सोडतानाच परदेशात त्यांची एक यशस्वी उद्योजक अशी ओळख आहे. अलिबाग ते टांझानिया असे यशोशिखर गाठताना त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेले अनुभव जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, सचिन इटकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून उलगडले.
जागतिक मराठी अकादमी, पीएनपी सांस्कृतिक कला विकास मंडळ व सेंटर फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडियाच्या वतीने आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी संमेलनात आमदार पाटील यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. अलिबागमध्ये प्रिंटिंग प्रेसचा पहिला व्यवसाय सुरू केला. परदेशात गेल्यानंततर क्रुझ, जलवाहतूक पाहून असे वाटायचे आपण समुद्राचा खरा उपयोग करतच नाही. नितीन गडकरी आणि माझ्यात साम्य आहे, आम्हाला व्यवसायाच्या संधी लगेच ध्यानात येतात. त्यामुळेच अलिबाग ते मुंबई प्रवासासाठी पहिली कॅटामरॅन आणली. त्या वेळी सात कोटींचे ते जहाज आॅस्ट्रेलियातून आणले होते. मात्र, भारत आणि आॅस्ट्रेलियातील समुद्रात मोठा फरक आहे. आपल्याकडे असलेल्या समुद्रातील कचऱ्यामुळे बोटीचे इंजिन वारंवार बंद पडायचे. त्या समस्येवर उपाय शोधला. सहा महिन्यात केवळ ६०० लोकांनीच या बोटीने प्रवास केला. मात्र, आज दररोज दहा हजार लोक या सुविधेचा लाभ घेतात. जलवाहतूक सुरू केल्यामुळे अलिबागचा चेहरा-मोहरा बदलला आहे. पर्यटन व्यवसाय फोफावला आहे. येणाºया काळात अलिबागला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प आहे, असे पाटील म्हणाले.
सातासमुद्रापार व्यवसाय करण्याची जिद्द होती. त्यातून दुबईत व्यवसाय केला. व्हिएतनाममध्ये बंदर विकासासाठी जागा मिळाली आहे. मागास किंवा विकसनशील देशांपेक्षा विकसित राष्ट्रांमध्ये व्यवसाय करणे सोपे आहे. मात्र, आमचे व्याही सतीश टकले एकदा टांझानियाला गेले. तेथील माहिती मिळाल्यानंतर आफ्रिकन गरीब देशांमध्ये व्यवसाय उभा करण्याचा निश्चय झाला आणि टांझानियाला गेल्या आठ महिन्यांत ५०० एकरात ऊस उभा केला. पुढील काही महिन्यांत उसाचे पीक हाती येताना तिथे साखर कारखाना उभा करणार आहे. तिथल्या सरकारने दहा हजार एकर जागा ऊस लागवडीसाठी देऊ केली आहे. पुढील दीड वर्षात तिथे ऊस लावणार आहे. टांझानियात सर्वाधिक साखर उत्पादन करणारा आमचा कारखाना असेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. टांझानिया हा देश म्हणजे ५० वर्षांपूर्वीचा भारत आहे. मात्र, तेथील स्वच्छता, शिस्त, गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Jayant Patil's resolve to take Alibaug globally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.