अपंगत्वावर मात करीत जयेशचा संघर्ष, दहावीच्या परीक्षेसाठी सहायक देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:45 AM2017-09-19T02:45:58+5:302017-09-19T02:46:00+5:30

शिक्षण घेणे ही काळाची गरज असून, शिक्षणाशिवाय आधुनिक जगात पर्याय नाही हे सर्व जण जाणतात. या हेतूने प्रत्येक जण शिक्षण घेत आहे. शासनाने सुद्धा प्राथमिक शिक्षण घेणे अनिवार्य केले आहे.

Jayash's struggle with disability, demand for Assistance for Class X examination | अपंगत्वावर मात करीत जयेशचा संघर्ष, दहावीच्या परीक्षेसाठी सहायक देण्याची मागणी

अपंगत्वावर मात करीत जयेशचा संघर्ष, दहावीच्या परीक्षेसाठी सहायक देण्याची मागणी

Next

माथेरान : शिक्षण घेणे ही काळाची गरज असून, शिक्षणाशिवाय आधुनिक जगात पर्याय नाही हे सर्व जण जाणतात. या हेतूने प्रत्येक जण शिक्षण घेत आहे. शासनाने सुद्धा प्राथमिक शिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. अपंग सुद्धा याला अपवाद नाहीत. असाच जुम्मापट्टी येथे राहणारा जयेश शिंगाडे हा अपंग आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी संघर्ष करीत आहे.
जयेश तुकाराम शिंगाडे असे या आदिवासी विद्यार्थ्याचे नाव असून तो जुम्मापट्टी येथील मधुरम चॅरिटेबल ट्रस्टच्या आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्याने इयत्ता दहावीपर्यंत मजल मारली. दोन्ही हात नसताना शिक्षण घेण्याची त्याची जिद्द पाहून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
एका गरीब घरात जन्मलेल्या या विद्यार्थ्याला खांद्याला तीन छोटी बोटं असल्याने पेपर लिहिण्यासाठी शाळेतील परीक्षेत जास्त वेळ दिला जात होता, परंतु माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी त्यास सहायक लेखनिक मिळावा यासाठी शाळा प्रशासनाने आवश्यक ती कागदपत्रे बोर्डाकडे पाठवली आहेत आणि लवकरच त्याला संमती मिळेल, असा विश्वास आश्रमशाळेने व्यक्त
के ला आहे.
>दहावीच्या परीक्षेसाठी जयेश शिंगाडे यास सहायक लेखनिक मिळावा यासाठी शाळा प्रशासनाने आवश्यक ती कागदपत्रे बोर्डाकडे पाठवली आहेत. आणि लवकरच त्याला परवानगी मिळेल, असा विश्वास आश्रमशाळेने
व्यक्त
के ला आहे.
माझा मुलगा जयेश हा अपंग असून, त्याला दोन्ही हात नाहीत. त्याच्या खांद्याला छोटी तीन बोटे असून, तो त्या तीन बोटांनी लिहीत असतो. माझी एसएससी बोर्डाकडे एकच मागणी आहे आणि ती म्हणजे परीक्षेत त्याला सहायक लेखनिक द्यावा.
- तुकाराम शिंगाडे, वडील
जयेशला हात नसल्याने त्याच्या खांद्याला तीन छोटी बोटे असून त्यानेच तो साधारण लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु परीक्षेत पेपर सोडविण्यासाठी आम्ही त्याला जास्त वेळ देतो. यापुढे त्याला दहावीच्या परीक्षेसाठी एक सहायक लेखनिक आणि वीस मिनिटे जास्त मिळावी यासाठी शाळेच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, लवकरच त्याला मंजुरी सुद्धा मिळेल.
- नंदकुमार इकारे, मुख्याध्यापक

Web Title: Jayash's struggle with disability, demand for Assistance for Class X examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.