शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

‘जेरुसलेम गेट’ होणार जागतिक पर्यटन स्थळ, तब्बल २०० ज्यू धर्मीय बांधवांची नवगावला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 2:08 PM

सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले.

- जयंत धुळप

अलिबाग- सुमारे दोन हजार वर्षापूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्त्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव या ठिकाणी आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते हे अलिबाग तालुक्यातील नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरुसलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्त्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचं औचित्य साधून नवगाव या ठिकाणी भेट देवून भारतातील या आपल्या पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करुन, भारत-इस्त्रायला मैत्रीचा गोडवा वृद्धिगत केला आहे. रविवारी इस्त्रायलमधील तब्बल 200  ज्यू नागरिकांनी नवगांवला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि आता इस्त्नाएल मध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

तिळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक केला  बळकट यावेळी या सर्व ज्यूईश बांधवांनी नवगाव येथे आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना जेरुसलेम गेट या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. विनंती मान्य करुन बोलताना आमदार जयंत पाटील यांनी, नवगाव या ठिकाणी असलेल्या ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभिकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक  ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धीगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला. रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे. तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसीत केल्यास भारत आणि इस्त्नाएलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईलज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणो एकरुप झाला. आजच्या घडीला जगभर हदशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईल, अशी भावना इस्त्नाएल मधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.

 स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केलेदोन धर्मामध्ये कसे नाते असावे याचे प्रतिक म्हणून ‘जेरुसलेम गेट’ हे स्थळ विकासीत होऊ शकते. जागतिक शांततेसाठी हे एक आदर्श असे नाते आहे. भारताच्या आश्रयाला आलेल्या ज्यू धर्मियांना येथील स्थानिक समाजाने प्रेमाने आपलेसे केले. याची नोंद या स्थळाच्या माध्यमातून घेतली जाईल, अशी भावना ज्यू धर्मीय कुस्तीपटू आणि सन 1972 मधील ‘भारत श्री’ किताबप्राप्त विजू पेणकर यांनी व्यक्त केली आहे. दोन हजार वर्षापूर्वी भारतात ज्या ठिकाणी  ज्यू बांधवांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले ते  नवगाव येथील जेरु सलेम गेट चांगल्या प्रकारे विकसीत व्हावे, असे जगभरातील ज्यू धर्मियांना वाटत असते. यासाठी येथून गेलेली ज्यू मंडळी एकत्र येवून प्रयत्न करीत आहेत.त्या प्रयत्नांना आता नक्की यश येईल अशी भावना अमेरिकेत स्थाईक झालेले ज्यू धर्मीय जॉन पेरी पेझारकर यांनी व्यक्त केली आहे.पन्नास वर्षानंतरही आश्रयस्थळाशी नाते कायम

ज्यू बांधव नवगाव येथून इस्त्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेकजण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.   

टॅग्स :Jerusalem Gateजेरुसलेम गेट