रिक्षाचालकाने परत केले दागिने
By admin | Published: September 8, 2015 11:36 PM2015-09-08T23:36:33+5:302015-09-08T23:36:33+5:30
प्रवासात एखादी वस्तू हरवली की ती परत मिळणे कठीणच, मात्र कामोठेतील रिक्षाचालकाने प्रवाशाचे दोन लाखांचे सोन्याचे दागिने परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.
Next
पनवेल : प्रवासात एखादी वस्तू हरवली की ती परत मिळणे कठीणच, मात्र कामोठेतील रिक्षाचालकाने प्रवाशाचे दोन लाखांचे सोन्याचे दागिने परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला.
कामोठेतील धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखालील प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचा सभासद असलेला रिक्षाचालक पंडित बारकू पाटील (२६) याने ३ सप्टेंबरला रिक्षात सापडलेले दोन लाख रुपयांचे दागिने प्रवाशास परत केले. गुरुवारी कामोठे पोलीस स्टेशन ते मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करताना, प्रवासी दोन लाख रुपयांचे दागिने रिक्षामध्ये विसरून गेले होते. परंतु, रिक्षाचालक पाटील यांनी प्रामाणिकपणे दागिने परत केले.