जीवाजी महाले यांची प्रतापगडावर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:34 AM2017-10-10T02:34:02+5:302017-10-10T02:34:17+5:30
किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांची ३८२वी जयंती साजरी करण्यात आली. ‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे
पोलादपूर : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांची ३८२वी जयंती साजरी करण्यात आली.
‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जीवाजी महाले यांची अत्यंत दुर्मीळ तलवार, शिक्के, अप्रकाशित ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शिवकालीन नाणी, तसेच साधने प्रथमच शिवभक्तांना, नागरिकांना किल्ले प्रतापगड भूमीत जीवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ९ आॅक्टोबरला पाहावयास
मिळाली.
या वेळी शिवरत्न जीवाजी महाले यांचे अकरावे वंशज संतोष सकपाळ (महाले), इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, मीनाक्षी भदाने, गोविंदराव पिंपळगांवकर, विनोद तावरे, नरवीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदा काशिद आदी उपस्थित होते. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या शूरवीर जीवाजी महाले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यातील शिवभक्त सहभागी झाले होते.
स्मारकाची मागणी
कोल्हापूर येथील गिरीश नार्वेकर पथकाचे शिवकालीन मर्दानी खेळ पाहून सर्व शिवभक्त मंत्रमुग्ध झाले, अवघा शिवकाल डोळ्यासमोर या पथकांनी उभा केला. तसेच शिवव्याख्याते प्रदीप कदम यांनी जीवाजी महाले यांच्या चरित्रावर व्याख्यान दिले.
या कार्यक्र मासाठी महाराष्ट्रभरातून नाभिक समाजाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाºया वीर मावळ्यांचे वंशज सहभागी झाले होते.
शिवरत्न जीवाजी महाले यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.