जेएनपीटी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:34 AM2020-06-14T00:34:09+5:302020-06-14T00:34:17+5:30

इको टुरिझम प्रकल्पासाठी पाच कोटींचा खर्च : तीन वर्षांत अंमलबजावणी

JNPT to set up mangrove eco park | जेएनपीटी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

जेएनपीटी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

Next

- मधुकर ठाकूर 

उरण : जेएनपीटी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या मॅनग्रोव्ह सेलच्या मार्गदर्शनाखाली मॅनग्रोव्ह इको पार्क विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटीच्या बेलपाडा येथील मालकीच्या जागेत पाच कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविण्यासाठी आणि पर्यावरणाच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटक आधारित उभारण्यात येणाऱ्या इको टुरिझम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पामध्ये इंटरप्रिटेशन सेंटर, पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर, पार्किंग, गार्डन, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, ब्लॉक टॉयलेट्स आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे जैवविविधतेवरील पर्यावरण-पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला होईल, असा विश्वास जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला आहे.

जेएनपीटीचे उद्दिष्ट फक्त आर्थिक सामर्थ्य प्राप्त करणे नाही, तर पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरतेवरदेखील लक्ष्य केंद्रित करणे आहे. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण जेएनपीटीच्या नियोजन आणि प्रचालनाचा अविभाज्य भाग राहणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. जेएनपीटीची पर्यावरण व्यवस्थापन व निरीक्षण योजना (ईएमएमपी) सीएसआयआर-नीरी मुंबई यांनी तयार केली आहे आणि ईएमएमपीच्या नोडल अधिकाऱ्यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दरमहा आढावा बैठक घेतली जात असल्याची माहितीही सेठी यांनी दिली.

दोन टप्प्यांत राबविणार
यासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यामध्ये मॅनग्रोव्ह इको पार्क परिसरात वन्यजीवांच्या संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण, माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविणे आणि पर्यावरणाच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मॅनग्रोव्ह इको पार्क तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील वन विभाग, सरकार, मॅनग्रोव्ह सेल जेएनपीटीला मदत करणार आहेत.

Web Title: JNPT to set up mangrove eco park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.