जेएनपीटीच्या मालवाहतुकीमध्ये ९.१४ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:38 AM2021-02-09T01:38:20+5:302021-02-09T01:38:43+5:30

नवीन वर्षाची सुरुवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने ही वाढ झाली असल्याचे जेएनपीटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

JNPT's freight growth of 9.14 per cent | जेएनपीटीच्या मालवाहतुकीमध्ये ९.१४ टक्के वाढ

जेएनपीटीच्या मालवाहतुकीमध्ये ९.१४ टक्के वाढ

Next

उरण : जेएनपीटी बंदरातून जानेवारी महिन्यात ४ लाख ६५ हजार ८४ वीस फुटी कंंटेनर मालाची (टीईयूची) वाहतूक करण्यात आली. मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या हाताळणीच्या तुलनेत ९.१४ टक्के वाढ अधिक आहे. नवीन वर्षाची सुरुवात व लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याने ही वाढ झाली असल्याचे जेएनपीटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.

  जेएनपीटीने जानेवारी २०२१ मध्ये एकूण ६.५० दशलक्ष टन मालवाहतुकीची हाताळणी केली आहे. तर जानेवारी २०२० मध्ये ५.९१ दशलक्ष टन्स मालाची हाताळणी झाली होती. बल्क कार्गोच्या हाताळणीमध्येसुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ३८.९८ टक्के वाढ झाली आहे. मागील महिन्यात ०.८२ दशलक्ष टन बल्क कार्गोची हाताळणी झाली आहे. याचबरोबर जानेवारी महिन्यात शॅलो वॉटर बर्थवर १ लाख ३४ हजार ७१३ मेट्रिक टन किनारपट्टीवरील सिमेंटची उच्चांकी वाहतूक करण्यात आली आहे. या अगोदर फेब्रुवारी २०१९ मध्ये सर्वाधिक १ लाख ३ हजार ५६० मेट्रिक टन सिमेंट वाहतुकीची नोंद झाली होती. 
  जेएनपीटीमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये जानेवारी महिन्यात ५१ हजार १६३ ट्रॅक्टर ट्रेलरच्या माध्यमातून ७८ हजार ८४० टीईयूची मालवाहतूक झाली. जानेवारी महिन्यामध्येच जेएनपीटीने ६० मेट्रिक टन क्षमतेचा एक ‘डेझी स्टार’ टग ताफ्यामध्ये समाविष्ट केला आहे. 

एसईझेडमध्ये १६ भूखंडांच्या वाटपासाठी लिलाव 
जेएनपीटी कोविड पूर्व कामगिरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. यापुढेही ही वाढ अशीच कायम राहील. बंदरामध्ये अनेक उपक्रम राबविले जात आहेत. ज्यामुळे पोर्टची कामगिरी सुधारण्यास मदत झाली आहे. बंदर आधारित एसईझेडचा यशस्वीरित्या विकास करणारे जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर आहे. जगातील अग्रगण्य कंपन्या जेएनपीटी सेझमध्ये गुंतवणुकीसाठी आकर्षित होतील, असा विश्वास जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला आहे. जेएनपीटी सेझचा डीपीआरसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. 

Web Title: JNPT's freight growth of 9.14 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.