शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जेएनपीटीचे पार्किंग प्लाझा सुरू, सेंट्रलाइज्ड पार्किंगसाठी १७० कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 1:04 AM

JNPT News : जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात.

उरण - जेएनपीटीचा सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आला आहे. सुमारे ४५ हेक्टर क्षेत्रामध्ये १७० कोटींची गुंतवणूक करून विकसित केलेल्या या पार्किंग प्लाझामध्ये एकाच वेळी १,५३८ ट्रॅक्टर ट्रेलर्स पार्क करण्याची क्षमता आहे. ऑपरेटर निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंदराच्या पायाभूत सुविधा सुधारणेच्या उपक्रमांतर्गत जेएनपीटीने बंदराबाहेर उभारलेला नवीन सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्याही दूर होईल, असा विश्वास व्यक्त जेएनपीटी प्रशासनाने व्यक्त  केला आहे. जेएनपीटी बंदरातून दररोज सुमारे १४ हजार कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र, आवश्यकतेनुसार ट्रॅक्टर-ट्रेलर्ससाठी पार्किंगची व्यवस्था नाही. बंदराबाहेरच्या रस्त्यांवरच वाहने पार्किंग केली जातात. शिवाय यामुळे वाहतुकदार, आयात-निर्यातदार आणि बंदराचेही आर्थिक नुकसान होते. जेएनपीटी बंदरात आयात-निर्यात व्यवसाय आणखी सुलभ करता यावा, यासाठी आता जेएनपीटीने सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाची उभारणी केली आहे.या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाचा विकास फॅक्टरी स्टफ्ड निर्यात कंटेनर वाहून नेणारे ट्रॅक्टर ट्रेलर्सच्या एकत्रित पार्किंगसाठी उपयोग होणार आहे. पार्किंग प्लाझामधील अत्याधुनिक सुविधा आणि सेवा तरतुदींमुळे कस्टम विभागाशी संबंधित दस्तऐवज प्रक्रिया एकाच ठिकाणी पूर्ण होणार आहे. या प्लाझामध्ये व्यवस्थापन रिअल टाइम पार्किंग व्यवस्थापन प्रणालीचा वापर, वाय-फायची सुविधा, निर्यात कंटेनरची मुक्त तपासणी व रिफर कंटेनरला वीजपुरवठा करण्याची सोय आहे, तसेच ट्रक चालकांना राहण्यासाठी सोय, कॅन्टीन, वाहन दुरुस्ती, देखभाल या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामध्ये प्रत्येक प्रवेशद्वार व प्रवेश लेनवर सुरक्षारक्षक व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जे ट्रॅक्टर ट्रेलरना प्रवेशासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रवेशद्वार व प्रवेश लेनवर जाण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. ज्यामुळे प्रवेशासाठी ट्रॅक्टर ट्रेलरची रांग लागणार नाही वा प्रतीक्षा करावी लागणार नाही, याची दक्षताही सुरक्षा कडून घेतली जात आहे. या पार्किंग प्लाझामध्ये ड्राय, धोकादायक, रीफर या प्रकारातीलही कंटेनर पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधील ट्रॅक्टर ट्रेलरना  त्याच्या पार्किंगच्या ठिकाणी व्हेरिएबल मेसेजिंग चिन्हे, इतर चिन्हे वापरून मार्गदर्शन केले जात आहे. एकदा एक्स्पोर्ट ऑर्डर जारी झाल्यानंतरच ट्रॅक्टर ट्रेलर संबंधित एक्झिट गेटमधून पार्किंग प्लाझामधून बाहेर जाऊ शकणार आहेत. यामुळे तस्करी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा ही जेएनपीटी बंदर प्रशासनाकडून केला जात आहे.  

एमआयएस प्रणाली पार्किंग प्लाझामध्ये एमआयएस प्रणालीही जोडण्यात आली आहे. या प्रणालीमुळे  ड्रायव्हरचे नाव, संपर्क क्रमांक, ट्रॅक्टर ट्रेलरची पार्किंग प्लाझामध्ये येण्याची वेळ, ट्रक क्रमांक, कंटेनर क्रमांक, कंटेनरचा आकार, प्रकार, शिपिंग बिल क्रमांक, सीएचए संपर्क, टर्मिनल यांसारखा ट्रॅक्टर ट्रेलरचा तपशील नोंदविला जाईल. एकदा प्रवेशद्वारांवर डेटा एन्ट्री झाल्यावर ट्रॅक्टरच्या ट्रेलरला डेस्टिनेशन टर्मिनल, कार्गोचा प्रकार, कंटेनरचा आकार इत्यादी वैशिष्ट्यांनुसार पार्किंग क्रमांक देण्यात येत आहेत. ही संग्रहित सर्व माहिती तारीख, वेळ, स्टॅम्पसह पार्किंग नंबर व युनिक आईडीशी जोडली जाते, तसेच मध्यवर्ती सर्व्हरमध्ये संचयित केली जाते.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड