जोगेश्वरी मंदिराच्या वैभवात पडणार भर
By admin | Published: October 20, 2015 11:49 PM2015-10-20T23:49:22+5:302015-10-20T23:49:22+5:30
येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात
नागोठणे : येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज,व्याघ्रेश्वर महाराजांचे पुरातन मंदिराचा पंधरा वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करून लोकवर्गणीच्या माध्यमातून अद्ययावत असे मंदिर बांधण्यात आले आहे. शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून रायगड जिल्ह्यात त्याची गणना होत आहे. मंदिराबरोबर परिसराचे सुद्धा सुशोभीकरण करण्यात आले असल्याने नागोठणेकरांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून या भागाला ओळखले जात आहे. मंदिराला पुन्हा रंग देण्याचा निर्णय घेतला असून या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याचे जोगेश्वरी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांनी मुलाखतीत सांगितले.
येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरीमाता, भैरवनाथ महाराज, व्याघ्रेश्वर महाराज यांचे दीडशे ते दोनशे वर्षे येथे वास्तव्य आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेची पालखी आणि नवरात्रौत्सव असे कार्यक्र म घेतले जातात. नागोठणेच्या पूर्वेला (आताचे रेल्वे स्थानकाजवळ) डोंगरावर या देवीचे मूळ स्थान आहे. त्याकाळात नागोठणे शेजारील मुरावाडी येथील हिरू ताडकर यांच्या स्वप्नात देवीने येवून सांगितले, की पूर्वेच्या डोंगरावर मी असून तेथून मला उचल व तुला जेथे मी जड होईन तेथे मला सोडून दे. स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे ताडकर यांनी डोंगरावर जावून देवीचा शोध घेतला असता, त्यांना देवीची मूर्ती (पाषाण) आढळून आली. पाषाण डोक्यावर घेवून ते नागोठणे मार्गे मुरावाडीला जात असताना येथील तीन तळ्याजवळ मूर्ती जड झाली व त्यांना पुढे मूर्ती नेणे अशक्य झाल्याने त्यांनी ती खाली ठेवली व कालांतराने देवीची येथे स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका सांगितली जाते.
१६ वर्षांपर्वूी जीर्णोद्धार
पूर्वी असणाऱ्या बैठ्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा नरेंद्र जैन यांच्या पुढाकाराने निर्णय घेण्यात आला व पंधरा - सोळा वर्षांपूर्वी येथे सुबक असे मंदिर बांधण्यात आले. अनेक दैवतांची मंदिरे येथे असल्याने दररोज हजारो नागरिक या भागात येत असतात.
मंदिरासमोर दोन तलाव असल्याने त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, माजीमंत्री रवीशेठ पाटील, आ. अनिल तटकरे यांनी या कामासाठी लाखो रु पयांचा निधी उपलब्ध करून दिला.