कुपोषणमुक्तीसाठी उचलला संयुक्त विडा; रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 11:55 PM2020-12-17T23:55:51+5:302020-12-17T23:55:55+5:30

कुपोषित बालकांवर उपचारासाठी सामंजस्य करार

Joint Vida picked up for malnutrition | कुपोषणमुक्तीसाठी उचलला संयुक्त विडा; रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

कुपोषणमुक्तीसाठी उचलला संयुक्त विडा; रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

Next

रायगड : एकात्मिक बाल विकास प्रकल्प, रायगड जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन आणि आयपीसी (भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना) यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव, सुधागड तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या आरोग्यासंदर्भात उपचार करण्यासंबंधी सामंजस्य करार १६ डिसेंबर रोजी करण्यात आला.  त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते.
या करारावर रायगड जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, स्वदेस फाउंडेशनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, सुधीर वाणी तसेच आयपीसीतर्फे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारानुसार पुढील पाच वर्षांत कुपोषणमुक्त दक्षिण रायगड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. 

आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण 
स्वदेस फाउंडेशन अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हा प्रकल्प जिल्ह्यातील सात तालुक्यांतील कुपोषणमुक्तीसाठी वरदान ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.

आयआयपीकडून मोफत सेवा
स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी कुपोषणमुक्तीसाठी स्वदेस फाउंडेशनतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयआयपीचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी या कार्यक्रमासाठी आयआयपीकडून मोफत सेवा देणार असल्याचे सांगितले.

बालरोगतज्ज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करणार 
 जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करण्यासाठी संयुक्तपणे उचललेला विडा कुपोषित बालकांसाठी संजीवनी ठरण्याची आशा आहे. यामध्ये भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करणार आहे. 
 जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या वतीने आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहेत. स्वदेस फाउंडेशन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहे.
 कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, डॉ. सचिन अहिर, सुधीर वाणी व पाणी व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Joint Vida picked up for malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.