मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

By राजेश भोस्तेकर | Published: November 9, 2022 12:56 PM2022-11-09T12:56:19+5:302022-11-09T12:56:29+5:30

कोलाड नाक्यावर जिल्ह्यासह कोकणातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.

Journalist Road for Pothole Free Highway on Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

मुंबई-गोवा महामार्गावर खड्डेमुक्त महामार्गासाठी पत्रकार रस्त्यावर

googlenewsNext

अलिबाग :  मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डयांच्या विरोधात आज जिल्ह्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन मानवी साखळी करून आंदोलन केले. रायगड नव्हे तर कोकणातुन यावेळी पत्रकार कोलाड येथे जमा झाले होते. आजचे आंदोलन हा इशारा आहे, खड्डे बुजवले गेले नाहीत आणि रखडलेल्या चौपदरीकरणाचे काम मार्गी लागले नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्या पत्रकारांनी यावेळी प्रशासनाला एस.एम. देशमुख, विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद यांनी दिला आहे.

कोलाड नाक्यावर जिल्ह्यासह कोकणातून पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांनी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमला होता. मुंबई गोवा महामार्ग हा ऐतिहासिक मध्ये मोडला गेला आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिलाच टप्पा पूर्ण होताना प्रशासन आणि शासनाला दम फुटला आहे. हा रस्ता व्हावा यासाठी पत्रकारांनीच आधी आंदोलन केले होते. त्यानंतर महामार्गाचे काम सुरू झाले होते. मात्र बारा वर्ष झाले तरी अद्याप हा महामार्ग अपूर्णच राहिला आहे. त्यामुळे पुन्हा पत्रकारांना महामार्गाच्या समस्येसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

Web Title: Journalist Road for Pothole Free Highway on Mumbai-Goa Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग