अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 01:58 AM2019-12-06T01:58:23+5:302019-12-06T01:58:32+5:30

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे.

JSW Co. Penal fined 5 crore 5 lakh for unauthorized payment | अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

Next

- आविष्कार देसाई

अलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने दहा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमध्ये मातीचा भराव (राखेचा स्लॅक) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवर यांनी कंपनीला तब्बल पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तब्बल सात महिने उलटून गेली तरी अद्याप त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही.
मौजे शहाबाज येथील ग.नं. ६१८/०, ७९६/०, ६९७/०, ५२२/अ, ५१०/०, ७२०/०, ७१८/०, ७१७/०, ७१४/० आणि ७८८/० या मिळकतीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाºया मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विनापरवाना केला असल्याचे दिसून येते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केली होती. शेतकºयांच्या तक्र ारीनुसार तसेच शहाबाज तलाठी यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये फौजदारी संहिता कलम १३३ नुसार ३० मार्च २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिल २०१९ रोजी लावण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकाºयांनी १ एप्रिल रोजी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस काढली.
सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे. मातीच्या उत्खननाची दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाचपट म्हणजेच प्रति ब्रास २४९० होती. त्यानुसार जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास मातीसाठी एकूण पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले होते. त्यानंतर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कंपनीने दंडाची रक्कम भरली नसल्याचे प्रातांधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्य होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे, असे शहाबाजचे ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.

जेएसडब्ल्यू कंपनीने दहा शेतकºयांच्या खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदा भराव केलेला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीला या प्रकरणी पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या आता पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले आहे.
- शारदा पोवार,
प्रांताधिकारी, अलिबाग

Web Title: JSW Co. Penal fined 5 crore 5 lakh for unauthorized payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड