नागोठणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी सकाळी १० पासून सुरुवात करण्यात आली. काम दिवसभरात पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत चालू करण्यात येईल, असे जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
येथील केटी बंधारा ते डोलवी अशी जेएसडब्ल्यू कंपनीची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून कंपनीकडून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नागोठणेसह या मागातील ४५ गावे व वाड्यांना मोफत पाणीपुरवठा केला जातो. १९ जुलैला ही जलवाहिनी फुटल्याने कंपनीकडून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर दोन-चार दिवसांनीच कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ही जलवाहिनी महामार्गाच्या खाली असल्याने ठेकेदाराकडून रस्ता खोदण्यास हरकत घेण्यात आली व रस्ता खोदायचा असल्यास जिल्हाधिकाºयांची परवानगी आणणे बंधनकारक आहे, अशी सूचना कंपनीला दिल्याने काम बंद करण्यात आले होते. कंपनीने परवानगी मिळण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकाºयांकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांना परवानगी मिळविण्यात यश मिळत नव्हते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून ही परवानगी मिळवून दिली व गुरुवारी कामाला सुरुवात करण्यात आली.
याबाबत येथील ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य शैलेंद्र देशपांडे यांनी सांगितले की, डॉ. गोºहे यांनी याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये वाचले होते व प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाबाबत चालढकल केली जात आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले होते. तातडीने त्यांनी तसेच विधान परिषदेतील त्यांचे सचिव खेबुडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांकडून तातडीने संबंधित आदेश काढण्याची सूचना दिली व त्याप्रमाणे गुरुवारी कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. पाणीटंचाईच्या काळात या जलवाहिनीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांनी सहकार्य करण्याची भूमिका बजावल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी सांगितले.पूर्वीच्या महामार्गाच्या जुन्या रस्त्यापासून ही जलवाहिनी १५ मीटर दूर होती; परंतु चौपदरीकरणाच्या कामात नव्या रस्त्याच्या खाली ही जलवाहिनी गेल्याने महामार्ग खोदल्याशिवाय तिचे काम शक्यच नव्हते. दोन पाइपना जोडणारी रिंग बाहेर आल्याने पाण्याची गळती प्रचंड प्रमाणात चालू होती. हे काम करण्यासाठी पाच तासांचा अवधी लागणार असून काम सायंकाळपर्यंत पूर्ण होईल व शुक्रवारपासून ही जलवाहिनी पूर्ववत चालू होईल आणि सर्व गावांना पाणी उपलब्ध होईल.
-मुरलीधर नायर, पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जेएसडब्ल्यूमहामार्गावर पोलीस तैनातखोदकामासाठी नागोठण्यातून जाणारा मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून महाडकडे जाणारी सर्व वाहतूक, मिरामोहिद्दीन शाहबाबा कमानीमार्गे रिलायन्स चौक, आंबेघर फाटा, वरवठणे, आमडोशीकडून वाकण फाट्यावर, तर मुंबईकडे जाणारी वाहने याच मार्गावरून रिलायन्स चौकामार्गे होली एंजल शाळेमार्गेपेण फाट्यावरून महामार्गावर वळविण्यात आली होती. वाहतूक नियंत्रणासाठी सर्व फाट्यांवरदोन पोलीस अधिकाºयांसह १५ वाहतूक पोलीस तैनात ठेवण्यात आले होते, अशी माहिती येथील पोलीस ठाण्याचे पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांनी दिली.