जेएसडब्ल्यूची वाहिनी शेतकऱ्याच्या जागेतून

By admin | Published: January 11, 2016 02:03 AM2016-01-11T02:03:25+5:302016-01-11T02:03:25+5:30

जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला

JSW's line from the farmer's place | जेएसडब्ल्यूची वाहिनी शेतकऱ्याच्या जागेतून

जेएसडब्ल्यूची वाहिनी शेतकऱ्याच्या जागेतून

Next

नागोठणे : जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला असून त्यामुळे उर्वरित जागेचे मूल्य शून्य झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अरु ण शिर्केयांनी ही जलवाहिनी कोणाच्याही खाजगी जागेतून न नेता महामार्गाच्या जागेतूनच ती टाकण्यात आली असल्याचे सांगितले.
येथील के.टी. बंधारा, पाटणसई ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी-वडखळ अशी नव्याने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. याच मार्गात रफीक अ. वहाब अधिकारी यांची चिकणी गावाचे हद्दीत सर्वे नं. गट १५३ क्षेत्र ००- ७३- ०३ हे. आर अशी मालकीची जमीन आहे. या जागेपैकी २ हजार ५७० चौ. मीटर जागा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली गेली आहे व उर्वरित जागा अद्यापि अधिकारी यांच्या खुद्द मालकीची राहिली आहे.
महामार्गाच्या शेजारून सध्या जेएसडब्ल्यूकडून जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. महामार्गालगत असलेल्या आमच्या जागेतून आमची परवानगी तसेच मोबदला न देता कंपनीने जलवाहिनी टाकली असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कंपनीकडे यापूर्वी जाब विचारला असता, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याचे असिफ अधिकारी म्हणाले. जमिनीचे मालक असलेले माझे बंधू रफीक अधिकारी नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात असल्यामुळे त्याचा फायदा कंपनीने घेत अनधिकृतपणे या जागेत जलवाहिनी टाकण्याचा पराक्र म केला असल्याचे अधिकारी यांचे म्हणणे आहे. कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून संबंधित मिळकतीचे भूसंपादन केलेले नाही व कोणतीही नोटीस दिली नसून कंपनी फायद्यासाठी जलवाहिनी टाकत आहे, असे ते म्हणाले. (वार्ताहर)

Web Title: JSW's line from the farmer's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.