ज्योतिका पाटेकरला रौप्य पदक
By Admin | Published: January 26, 2017 03:26 AM2017-01-26T03:26:19+5:302017-01-26T03:26:43+5:30
वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात रायगडचा मान उंचावणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी कोईमतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून
माणगाव : वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात रायगडचा मान उंचावणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी कोईमतूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवून रौप्य पदक प्राप्त के ले. दुसरा क्र मांक पटकावून रायगडच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.
डिसेंबर २०१६ मध्ये जळगाव येथे पार पाडलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४८ वयाच्या गोरेगाव येथील दाबेली नाश्ताची टपरी चालवणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी प्रथम क्र मांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतर त्यांची निवड कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्र मांक पटकावून रौप्य पदक मिळवले. राजस्थान, कर्नाटक, ओडिशा, गुजरात आदी राज्यांतून सुमारे २८ स्पर्धकांनी या गटात सहभाग घेतला होता. २१ ते ३१ मार्च रोजी जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. (वार्ताहर)