कळंबोलीत पाणीटंचाई

By admin | Published: October 16, 2015 02:17 AM2015-10-16T02:17:31+5:302015-10-16T02:17:31+5:30

येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे

Kalamboli water shortage | कळंबोलीत पाणीटंचाई

कळंबोलीत पाणीटंचाई

Next

कळंबोली : येथील वसाहतीत मागणीच्या तुलनेत कमी पाणीपुरवठा होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एलआयजी व रोडपाली परिसरात परिस्थिती अतिशय बिकट आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालय परिसरात पाणीच आले नसल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कळंबोली कॉलनीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सिडकोला मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयश येत आहे. पाण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. कळंबोलीत एकूण आठ हजार ग्राहक असून, त्यामध्ये सिडको इमारतींची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर खासगी इमारतीही वाढल्या आहेत. त्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे.
आजच्या घडीला कळंबोली ३० एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र एमजेपीकडून सरासरी फक्त २२ एमएलडीच पाणी मिळत असून, बुधवारी तर २० एमएलडीच मिळाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पोलीस मुख्यालय परिसरात इमारतींना पाणीच मिळत नसल्याच्या तक्र ारी येत आहे. सेक्टर-१७ येथील नीलकंठ टॉवर येथे गेल्या पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याचे रहिवासी बालाजी घुमे यांनी सांगितले. टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
च्एलआयजीमध्ये पाणीची मोठीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी बुधवारी थेट सिडको कार्यालय गाठले आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नवी मुंबई महानगर पाणीपुरवठा योजनेतून पनवेल परिसराकरिता २५ एमएलडी पाणी दिले जात होते ते बंद झाले आहे. त्यामुळे एमजेकडून मागणीच्या तुलनेत नवीन पनवेल व कळंबोलीला कमी पाणी मिळत आहे.

Web Title: Kalamboli water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.