कळंबोली स्टील मार्केट पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:07 AM2017-07-29T02:07:40+5:302017-07-29T02:07:59+5:30
कळंबोली स्टील मार्केटमधील लोहपोलाद गोदाम आणि यार्ड सध्या पाण्याखाली गेले आहे. अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमधील लोहपोलाद गोदाम आणि यार्ड सध्या पाण्याखाली गेले आहे. अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना या ठिकाणी काम करणाºया माथाडींना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असली तरी याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाही.
कळंबोली लोह-पोलाद मार्केट सिडकोने विकसित करत असताना अंतर्गत रस्ते निर्माण केले नाहीत. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हे रस्ते मातीचेच आहेत. देशाच्या कानाकोपºयातून लोखंड आणि पोलादाची ने-आण करण्याकरिता अवजड वाहने या ठिकाणी येतात. शेकडो कि.मी. अंतर कापताना जितका त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास स्टील मार्केटमध्ये वाहने आल्यावर होतो याशिवाय वाहनांचे नुकसानही होत असल्याने मेंटेनन्सवरही खर्च
होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
स्टील मार्केटमधील रस्त्यावर कधीच डांबर टाकण्यात आलेले नाही. दोन ते तीन फूट खोल खड्डे याठिकाणी पडले आहेत. ते बुजविण्याची तसदी ना सिडकोने घेतली ना बाजार समितीने. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यातच पावसाचे पाणी जाण्याकरिता पावसाळी नाले नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्ते पाण्यात व खड्ड्यांत हरवले आहेत. कित्येक वाहने बंद पडल्याने ते बाहेर काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागली. लोखंड उचलण्याकरिता क्रे न सुद्धा पाण्यात चालवणे अतिशय कठीण झाले होते. स्टील यार्ड त्याचबरोबर व्यापाºयांच्या गोदामात पाणी शिरल्याने मालाची वाहतूक काही प्रमाणात मंदावली आहे. लोह-पोलाद बाजार समितीने खड्डे बुजविण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची तक्रार शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे. याठिकाणी तात्पुरते नाले काढून पावसाच्या पाण्याला वाट करून देण्याची गरज असल्याचे मत वाहतूकदार गोविंद साबळे यांनी व्यक्त केले.
लोह-पोलाद बाजार समिती व्यापाºयांकडून कर वसुली करते. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात येणाºया वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. या बाजार समितीला उत्पन्न बºयापैकी असताना पायाभूत सुविधांवर खर्च केला जात नसल्याचा आरोप वाहतूकदार मुरलीधर गुरव यांनी केला आहे. सिडकोकडे बोट दाखवत ही समिती आपली जबाबदारी झटकत असल्याचेही व्यापारी आणि वाहतूकदारांचे म्हणणे आहे.