खारघर मधील कांबळे दाम्पत्याला आयोध्येत श्रीराम पूजेचा मान
By वैभव गायकर | Published: January 19, 2024 12:30 PM2024-01-19T12:30:01+5:302024-01-19T12:31:20+5:30
नवीन खारघरमधील कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.
वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या न्यास समितीने जोरदार तयारी केली आहे. या सोहळ्यासाठी देशासह जगभरातील मान्यवर हजेरी लावणार आहेत. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहूमान देशातील 11 दाम्पत्यांना मिळाला आहे. त्यात नवीन खारघर मधील कांबळे दाम्पत्याचा सामावेश आहे.
22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभू श्रीरामाची पूजा करण्याचा मान कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्याना ही संधी मिळाली असून यात कांबळे दाम्पत्य देखील आहेत.विशेष म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्याचा सौभाग्य या कांबळे कुटुंबियांना मिळणार आहे.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे दि.3 जानेवारी रोजी कांबळे कुटुंबियांना निमंत्रण मिळाले आहे.याकरिता दि.20 रोजी कांबळे दाम्पत्य आयोध्येकडे रवाना होणार आहेत.खारघर मधील कांबळे कुटुंबीय खारघर सेक्टर 21 मधील हावरे स्प्लेंडर याठिकाणी वास्तव्यास आहेत.कांबळे हे आरएसएस स्वयंसेवक असुन त्यांना मिळालेल्या या बहुमानाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.