पनवेल : कामोठे ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून या भ्रष्टाचारामध्ये ग्रामसेवक जे. जे. म्हात्रे यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप कामोठे ग्रामपंचायतीच्या एका सदस्याने केला आहे. या ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. कामोठेतील ग्रामपंचायत सदस्य राकेश गोवारी याने ग्रामसेवकावर गंभीर आरोप केले आहेत, त्यामध्ये ग्रामसेवक हा ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नसून परस्पर कामांच्या कोऱ्या निविदा देऊन ठराव मंजूर करून घेत आहेत. ठराव करत असताना ग्रामपंचायत सदस्यांना अंधारात ठेवले जात आहे, होणाऱ्या मासिक सभेमध्ये झालेला खर्च पारदर्शकपणे दाखविला जात नाही. कामोठे ग्रामपंचायतीचे खाते रायगड जिल्हा बँकेत होते. हे खाते कोणतीही माहिती न देता कर्नाळा नागरी सहकारी बँकेत चालू केले, याची चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ग्रामपंचायतीने खरेदी केलेले बाकडे, कचरा पेट्या आदींच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे. खुर्च्यांच्या खरेदीतही घोळगतवर्षी पंचायतीतर्फे खुर्च्या वाटप करण्यात आल्या होत्या. यात प्रति खुर्ची ६०५ रुपये एवढे दाखविण्यात आले असून प्रत्यक्षात या खुर्च्यांचा बाजारभाव २४० रुपये एवढा दाखविला आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गोवारीने केला आहे.
कामोठे ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार!
By admin | Published: August 13, 2015 12:20 AM