करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची १८ डिसेंबर रोजी पंचवार्षिक निवडणूक   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 10:14 PM2022-11-19T22:14:10+5:302022-11-19T22:14:46+5:30

वार्षिक ५० कोटींची उलाढाल असलेली करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे.

Karanja Fishermen's Executive Body quinquennium election on 18th December | करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची १८ डिसेंबर रोजी पंचवार्षिक निवडणूक   

करंजा मच्छीमार कार्यकारी संस्थेची १८ डिसेंबर रोजी पंचवार्षिक निवडणूक   

Next

 

मधुकर ठाकूर

उरण : राज्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सहकारी संस्थेचे शिरिष सकपाळ यांनी दिली.

करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था राज्यातील सर्वात मोठी संस्था आहे.वार्षिक सुमारे ५० ते ५१ कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण ३८१२ मतदार आहेत.३८१२ मतदार १७ संचालकांची गुप्त मतदानाने निवड करणार आहेत.यामध्ये दोन महिला ठार संचालकांचा समावेश आहे.याआधी २०१५ रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. २०२०-२१ मध्ये संस्थेची मुदत संपुष्टात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडली होती.आता मात्र मुदत वाढीनंतर येत्या १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर तत्काळ त्याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरिष सकपाळ यांनी दिली.

Web Title: Karanja Fishermen's Executive Body quinquennium election on 18th December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.