आविष्कार देसाई अलिबाग : २६ जुलै हा दिवस देशभरात कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात यावर्षी तो अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा यद्धपट राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहात एकाच दिवशी आणि एकाच वेळी दाखवण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे ९० हजार महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना या युद्धपटाचा आनंद घेता येणार आहे. हा युद्धपट मोफत दाखवण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.
देशावर होणाऱ्या आतंकवादी हमल्यांना आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता चोख प्रतिउत्तर देऊन त्यांना चारीमुंड्या चीत करतात. भारतीय सैन्याची हिंमत, पराक्रम त्यांचे शौर्य आजही अबाधित आहे. सीमेवर आपले शूर जवान तैनात असल्याने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित आहेत. त्यांच्यामुळेच आपण शांतपणे झोपू शकतो. अशा सर्वच जवानांबाबत प्रत्येक भारतीयांना अभिमान आणि प्रेम आहे.
चीन, पाकिस्तान यांनी आपल्यावर हल्ले केले होते. त्यांच्या गोळ््यांना भारतीय जवानांनी चोख प्रतिउत्तर दिले आहे. आतंकवाद्यांना हाताशी धरुन पाकिस्तान देशाच्या विविध भागांमध्ये आतंकवादी हमले करत आहेत. १९९९ साली कारगिल युद्ध झाले होते. ते भारताने बखुबी जिंकले होते. पाकिस्तानने यातून धडा घेतला नाही. त्यांच्या कुरापती सुरुच राहिल्या. त्यांनी मुंबईवरील २६/११ हल्ला, गुरदासपूर हल्ला, पठाणकोट येथे वायू सेनेवर हल्ला त्यानंतर १८ सप्टेंबर २०१६ रोजी काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी ब्रिगेड मुख्यालयावर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये भारताचे १९ सैनिक आणि चार दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतर ११ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. भारतीय सैन्याच्या अभिमानास्पद कामगिरीने देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता.
२६ जुलै १९९९ रोजी करगिल युद्धातही भारताने शौर्य गाजवले होते. तो दिवस विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र राज्यात आगळवेगळ््या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्यातील सुमारे ३०० चित्रपटगृहांमध्ये उरी... द सर्जिकल स्ट्राइक हा युद्धपट दाखवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांची उपस्थिती राहणार आहे. याबाबतची बैठक संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहात १५ जुले रोजी पार पडली. या बैठकीला चित्रपटाचे निर्माते, वितरक यूएफओचे प्रतिनिधी, राज्यातील एक पडदा चित्रपटगृहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चित्रपट दाखवण्याच्या सूचना- सत्यजीत दळीया चित्रपटाचे सॅटलाइट प्रक्षेपण यूएफओमार्फत एकाच वेळी सर्व ठिकाणी सकाळी १० वाजता प्रक्षेपित केले जाणार आहे. अलिबागमधील ओम, ब्रम्हा, विष्णू, महेश या सिनेप्लेक्समध्येही उरी हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून हा चित्रपट दाखवण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तयारी सुरु असल्याचे चित्रपट गृहाचे मालक सत्यजीत दळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.