कर्जत : कर्जत दहिवली येथे बालगृह आहे. या बालगृहातून एका अल्पवयीन मुलाला पळविल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.बालगृहातील साईनाथ मारुती कोळी (१५), हा निरीक्षणगृहात २५ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इतर मुलांसोबत रायगड जिल्हा परिषदेच्या दहिवली येथील जीवन शिक्षण मंदिर शाळेत गेला होता. दुपारी १२ च्या सुमारास वर्गात दफ्तर ठेवून कोणालाही काहीही न सांगता, कोठेतरी निघून गेला. याबाबतची माहिती शिक्षकांनी निरीक्षणगृहाचे प्रभारी अधीक्षक हिरामण धुळे यांना दिल्यानंतर त्यांनी निरीक्षणगृहातील प्रवीण खानविलकर व समाधान पालकर यांना त्याचा शोध घेण्याकरिता पाठवले. मात्र, त्यांना साईनाथ कोळी याचा शोध लागला नाही. म्हणून प्रभारी अधीक्षक धुळे यांनी साईनाथ यास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले म्हणून कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दिली.पोलीस ठाण्यात गुन्हा २६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे पुढील तपास करीत आहेत. या मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास कर्जत पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे यांनी के ले आहे.
कर्जत बालगृहातील मुलाला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:33 AM