कांता हाबळेनेरळ : कर्जत-मुरबाड राज्यमार्ग तालुक्यातील प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. काहीच महिन्यांपूर्वी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजुरी मिळाली आहे. तीनच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. याअंतर्गत अनेक ठिकाणी मो-यांचे कामदेखील करण्यात आले; परंतु संबंधित ठेकेदाराकडून हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कशेळे गावाजवळील मोरीचा एक भाग खालच्या बाजूने खचला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोरी खचून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कर्जत तालुक्यातून अनेक महत्त्वाचे रस्ते जातात. त्यातील एक म्हणजे कर्जत-मुरबाड राज्यमार्ग हा होय. या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या काही ठिकाणच्या मोºया कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनला आहे. कर्जत-मुरबाड हा राज्यमार्ग असून, या रस्त्यावर रोज हजारोंच्या संख्येने लहान-मोठी वाहने धावत असून, यामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा रस्ता एक बाजूला चौककडे मुंबई-पुणे, तर दुसरीकडे कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गांना जोडला असल्याने नेहमीच येथे वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. तसेच रस्त्यात कडाव, कशेळे मोठी लोकसंख्या आणि बाजारहाटी गावे असून, येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. तसेच पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधून मुरबाड औद्योगिक वसाहतीकडे जाणाºया कंटेनर यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. त्यामुळे नेहमीच हा रस्ता गजबजलेला असतो. कर्जत-मुरबाड रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या मोºया कमकुवत झालेल्या आहेत. कशेळे गावच्या हद्दीतील वाकड्या पुलाजवळील मोरीला खालच्या बाजूने भले मोठे भगदाड पडले असून, सुरक्षा कठडाही संपूर्णपणे कोसळला आहे; परंतु संबंधित सार्वजनिक बांधकाम सुस्त झोपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कर्जत-मुरबाड राज्यमार्ग धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 2:56 AM