कर्जतमध्ये नवीन २४ कोरोना पॉझिटिव्ह, गणपतीनंतर रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:41 AM2020-09-04T00:41:28+5:302020-09-04T00:41:50+5:30
तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही.
कर्जत - तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्याच्या ग्रामीण व आदिवासी भागात कोरोनाने हैराण केले आहे. गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेलाही काय करावे हे समजत नाही.
गुरु वारी कर्जतच्या मुख्य शहरात चार कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून त्यातील ५४ वर्षीय व्यक्ती व ४३ वर्षांची महिला, १६ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. हे सर्व विठ्ठल नगरमधील आहेत. तर ५० वर्षांची महिला शहरातील अन्य भागात राहते. नेरळ या शहरवजा गावात ६८ वर्षांची महिला व २७ वर्षांचा युवक हे दोन रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
भिवपुरी येथील ३२ वर्षीय महिला, माले येथील ३१ वर्षांचा तरुण, शिंगढोळ येथील ६२ वर्षीय व्यक्ती, ३३ व २२ वर्षांचे युवक, गुढवण येथील ४४ वर्षांची व्यक्ती, वांजळे येथील ४७ वर्षांची व्यक्ती, लाडीवली येथील ४६ वर्षांची व्यक्ती यांना कोरोनाची बाधा झाली आहे.
डोंगरपाडा येथील ४५ वर्षीय व्यक्ती, कशेळे येथील २१ वर्षांची युवती, कोल्हारे येथील ७५ वर्षांची वयस्कर व्यक्ती, मिरचोळीवाडी येथील ४५ वर्षांची महिला, कळंब नजीकच्या सुतारपाडा येथील ४५ वर्षीय महिला, कळंब येथील ६० वर्षांची महिला, पोशिर येथील ४१ वर्षांची महिला, गरपोली येथील २५ वर्षांचा तरुण, वरई येथील २१ वर्षांची युवती आणि गणेगाव येथील ३३ वर्षांच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भीती वाढली आहे.
तालुक्यात ९२८ रुग्ण
गुरु वारी कोरोनाचे नवीन २६ रुग्ण आढळले असून आतापर्यंत तालुक्यात ९२८ रुग्ण सापडले आहेत. ७४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गुरु वारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४२ वर गेली आहे. रुग्णसंख्या पाहता जास्त काळजी घेण्याची गरज आहे.