कर्जत : भिवंडी येथून गुरे भरलेले दोन टेम्पो कर्जत तालुक्यातील दामत येथील कत्तलखान्यात जात असताना कर्जत पोलिसांनी हे टेम्पो पकडले. या दोन टेम्पोत असलेल्या ३० गुरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहेकर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांना फोनद्वारे माहिती मिळाली की चौक रस्त्याने कर्जतच्या दिशेने गुरे भरलेले दोन टेम्पो येत असून ते नेरळच्या दिशेने जाणार आहेत त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी २९ आॅक्टोबर रोजी सकाळी कर्जत चाराफाटा येथे सापळा लावला. सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास टेम्पो नंबर एमएच ४६/ई-९०४ मध्ये ९ गुरे व टेम्पो नंबर एमएच ०६/एजी-४१७९ या टेम्पोमध्ये २१ गुरे अशी ३० वेगवेगळ्या जातीची गुरे परवानगीशिवाय त्या गुरांना त्रास व यातना होतील अशा अवस्थेमध्ये भरून, दाटीवाटीने कोंबून, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना आढळले.आणगाव गोशाळा भिवंडी येथून ही गुरे कर्जत येथील दामत गावात आणण्यात येत असल्याचे तपास उघड झाले. पोलिसांनी टेम्पोचे चालक सुफियान सिराज नजे (३२), नईम मुश्ताक नजे (२७) आणि त्याच्या सोबत असलेला समीर गफूर नजे (३५) तिघेही राहणार दामतयांना अटक के ली. त्यांच्याकडून २ वाहनांसह ७,३७,००० रु पये किमतीची गुरे असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० च्या कलम ११ (घ) व महाप्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), ५(ब) चे उल्लंघन कलम ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित शिंदे हे करीत आहेत.
कत्तलीसाठी जाणा-या गुरांचा टेम्पो पकडला, कर्जत पोलिसांची कारवाई, दोन वाहनांसह तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 4:34 AM