कर्जत रेल्वे स्थानकातील सरकता जिना ३0 जूनअखेर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 01:33 AM2018-05-30T01:33:06+5:302018-05-30T01:33:06+5:30
कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर मुंबई दिशेकडे सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानकात फलाट क्र मांक दोनवर मुंबई दिशेकडे सुरू असलेल्या सरकत्या जिन्याचे काम ३0 जून २0१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे अशी माहिती कर्जत रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकज ओसवाल यांना मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यापूर्वी ३१ मार्च २0१८ पर्यंत या सरकत्या जिन्याचे काम पूर्ण होऊन प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तविली होती त्यामुळे जून अखेर तरी काम पूर्ण होते की नाही याकडे कर्जतकरांचे लक्ष लागले आहे.
कर्जत रेल्वे स्थानकावरील फलाट क्र मांक दोनवर सुमारे तीस लाख रु पये खर्च करून स्थानकातील पहिला सरकता जिना उभारण्यात येत आहे. त्याच्याच बाजूला मुंबई दिशेकडे उतरणाऱ्या जिन्याच्या पायºयांचे काम सुरू आहे. सरकत्या जिन्याचे काम जोरात सुरू आहे तर बाजूच्या जिन्याचे काम गेल्या चार - साडेचार वर्षांपासून सुरू आहे. सरकत्या जिन्याच्या कामाबद्दल पहिल्यांदा विचारले असता २0१८ मार्च अखेर काम पूर्ण होण्याची शक्यता कळविली होती. परंतु काम पूर्ण न झाल्याने ओसवाल यांनी पुन्हा प्रश्न विचारला असता आता २0१८ जून अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे लेखी उत्तर ओसवाल यांना रेल्वे प्रशासनाने दिले आहे.
गेल्या चार - साडेचार वर्षांपासून सुरू असलेले मुंबई दिशेकडील पायºयांच्या कामाबद्दल सुद्धा रेल्वे प्रशासनाने सारखे शक्यतांचे वायदेच दिले आहेत. सुरु वातीला २0१८ मार्च अखेर पायºयांचे काम पूर्ण होण्याची शक्यता सांगितली होती. मात्र आता २0१८ मे अखेरपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचा वायदा केला आहे. वास्तविक पाहता पायºयांचे काम पूर्ण होऊन काही प्रवासी त्यामधून वाट काढीत अडथळे पार करीत जिन्यावरून जातात, परंतु जिना संपल्यानंतर जी जुनी भिंत आहे ती काढल्यानंतरच या पायºयांचा मार्ग खुला होईल. आज आतासुद्धा ती भिंत तशीच असल्याने मे अखेर तरी या पायºयांचा मार्ग खुला होऊन जिन्याचा वापर सुरू होईल ना? याकडे कर्जतकर रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.