शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कर्जत तालुक्यात युती-आघाडीत खरी लढत

By admin | Published: February 17, 2017 2:14 AM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे

कर्जत : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कर्जत तालुक्यात सहा जिल्हा परिषदेचे व बारा पंचायत समितीचे प्रभाग आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-शेतकरी कामगार पक्ष आघाडी, शिवसेना-काँग्रेस युती यांच्या उमेदवारांमध्येच खरी लढत होणार आहे. भाजपाने आरपीआय बरोबर युती करून पदरात काहीतरी पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही उमेदवार निवडून आला नाही तरी तालुक्यातील आपल्या मतांचा अंदाज घेण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. मनसे, बसपा, भारिप बहुजन महासंघ, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी यांच्यासह एमएमआयचे उमेदवार आणि अपक्षांनीसुद्धा आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. असे असले तरी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचे काहीच चालणार नाही, असे चित्र दिसत आहे.अर्ज मागे घेण्याच्या आधीच काही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचे नारळ फुटले. घरोघर जाऊन गाठीभेटी घेतल्या. एक दोन ठिकाणी नाराज इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते; परंतु त्यांची कुणीही मनधरणी केली नाही. उलट त्या नाराजांनी निवडणूक लढविली तर प्रतिस्पर्ध्यांना मिळणारी मते नाराजांनाच मिळतील. असा कयास असल्याने सारे काही ठिकठाक आहे. शिवसेना-काँगे्रस युतीनेसुद्धा प्रचाराचा शुभारंभ करून गाठीभेटींना सुरुवात करून एक फेरी पूर्णही केली आहे. अद्याप कुणाच्या प्रचार सभा होणार हे जाहीर झाले नसले तरी आघाडीच्या वतीने आमदार सुरेश लाड प्रभागातील चार -पाच ठिकाणी सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले.अर्ज मागे घेण्याच्या वेळी उमरोली जिल्हा परिषद प्रभागातील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करण्याची पाळी पक्षावर आल्याने निशाणीची पंचाईत झाली. तसेच उमरोली पं .स. प्रभागात शिवसेनेने सुरुवातीला एका उमेदवाराला तयारी करायला सांगितले आणि आयत्या वेळेला दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म दिल्याने तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे त्या इच्छुकाने अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी केली होती; परंतु स्थानिक पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेतला. आणि तो घोळ तेथेच थांबला. भाजपाने अठरा जागांपैकी केवळ एक पंचायत समितीची जागा आरपीआयला देऊन युतीचा धर्म पाळला; परंतु त्या उमेदवाराला एबी फॉर्म उशिरा मिळाल्याने पक्ष चिन्हाशिवाय पुरस्कृत उमेदवारी लढविण्याची वेळ आली आहे.