कर्जत तालुक्यात सात जणांमुळे रुग्णसंख्या ५८
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:32 AM2020-06-21T00:32:56+5:302020-06-21T00:33:06+5:30
कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कर्जत: कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपी मुळे तेथील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आणखी सात नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५८वर पोहचली आहे.
कर्जत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आरोपी असलेला आरोपी कर्जत तहसिल कार्यालयाच्या कोठडीत असताना कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. त्या २५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आरोपी तरुणाच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलोस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. तर एका पोलिसाची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली असून आता त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस कर्मचारी यांची वाढ झाली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात बिनतारी संदेश विभागात काम करणाºया 36 वर्षीय पोलीस कर्मचारी यांचे कोरोना टेस्टचे अहवाल १९ जून रोजी पॉझिटिव्ह आले आहेत. 40 वर्षीच्या आरोपीला नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत कोरोना झाला आहे. त्या आरोपीच्या संपर्कात आल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील एक ५६ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस उपनिरीक्षकांच्या संपर्कात आलेल्या अनेक पोलीसांना कोरोन्टाइन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांना कोरोना ची लागण होण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्यता आहे. कर्जत तहसिल कार्यालयात यापूर्वी पुरवठा अधिकारी पदावर काम करणारे ५५ वर्षीय महसूल विभागातील नायब तहसीलदार यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.