कर्जत तालुक्यात बहरली तुळशीची शेती, तरु णवर्गाची औषधी शेतीकडे वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:44 AM2019-02-04T04:44:26+5:302019-02-04T04:45:42+5:30
कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे.
- कांता हाबळे
नेरळ - कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. तुळशीच्या शेतीपासून मोठा नफा मिळत असल्याने कर्जत तालुक्यातील तरुण शेतकरी तुळशीच्या शेतीकडे प्रभावित होत आहे. बेडीसगाव या आदिवासी भागानंतर आता नेरळ परिसरात तुळशीची शेती हिरवीगार झालेली पाहावयास मिळत असून ही शेती सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.
कर्जत तालुक्यात पारंपरिक भात शेतीबरोबर हिवाळ्यात वाल, तूर, हरभरा अशी रब्बी पिके घेतली जातात. अनेक भागात भात कापणीनंतर शेतात हरभरा, तूर, वालाचे पीक घेतात, यावर्षी ही शेती मोठ्या प्रमाणात फुलली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून नेरळ परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी औषधी शेती म्हणजेच तुळशीच्या शेतीकडे वळला आहे. कृष्ण तुळस आणि राम तुळस असे तुळशीचे प्रकार असल्याचे शेतकरी सांगतात. उल्हासनदीच्या पाण्यावर ही शेती बहरलेली दिसत आहे. अनेक एकर शेतीमध्ये तुळशीची शेती केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तुळस ही औषधी वनस्पती असल्याने अनेक उपयोगासाठी वापरली जात आहे. त्यापासून मोठे उत्पन्न मिळत असल्याने तरु ण या शेतीकडे वळले आहेत.
औषधी गुणधर्म असलेली वनस्पती तुळस ही घरोघरी आढळते. तशी तिची पूजा देखील घरोघरी केली जाते. मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीला सांैदर्यप्रसाधने तसेच औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांना याची आवश्यकता भासत असल्याने तुळशीला मागणी वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन तुळशीची शेती बहरत आहे. अगदी कमी खर्चात तुळशीची शेती होत असल्याने यात नुकसानीची भीती जवळजवळ यात नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. शेतात तयार झालेल्या तुळशीच्या जुड्या करून दादर, कल्याण हा या मोठ्या फुलांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत असतात. हार, पूजा व अनेक औषधी वस्तू बनविण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
औषधी वनस्पतींना मागणी- तरु ण शेतकरी
कर्जत तालुका हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हळूहळू अवकाळी पाऊस यात भातशेतीची होणारे नुकसान यामुळे शेतकरी आणि शेती कमी होत होती. मात्र आता पारंपरिक शेतीला छेद देत शेतकरी आणि त्यातल्या त्यात
तरु ण औषधी शेतीकडे वळत आहेत.
तुळस, कोरफड आदी औषधी शेती सध्या कर्जत तालुक्यात होत आहे. जर याकडे शासनाने लक्ष दिले तर शतावरीसाख्या अनेक औषधी गुणधर्म व मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वनस्पतीची शेतीसुद्धा बहरू शकते, असे मत तरु ण शेतकरी व्यक्त करत आहेत.
तुळशीची शेती करण्याची पद्धत
शेतामध्ये पाटीदार पद्धत करून त्यामध्ये तुळशीचे बियाणे टाकले जाते. अर्धा एकर शेतीला साधारण दोन हजार रु पये खर्च येतो. पाटीदार वाटिका करून त्यात पाणी सोडले जाते. या शेतीला शेणखत वापरले जाते. तीन महिन्यात ही तुळस तयार होते.
तुळशीची शेती ही अतिशय सोपी पद्धत आहे. पाटीदार पद्धतीने ही शेती केली जात असून तीन महिन्यात ही शेती तयार होते. तुळशीचे तीन प्रकार आहेत. ही औषधी वनस्पती असून मोठ्या प्रमाणात तुळशीची मागणी आहे. फुलांच्या बाजारात दादर, कल्याण बाजारपेठेत या तुळशीला मोठी मागणी आहे. यापासून मोठा नफा मिळत आहे.
- यशवंत भवारे,
कृषिनिष्ठ शेतकरी,
दहीवली