शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

कर्जत तालुक्यात बहरली तुळशीची शेती, तरु णवर्गाची औषधी शेतीकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 4:44 AM

कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे.

- कांता हाबळेनेरळ  - कर्जत तालुक्यातील नेरळ परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी शेती केली जात आहे. दहीवली, कोदिवले, मोहाची वाडी, बेडीसगाव अशा अनेक भागात तुळशीची शेती फुलली आहे. तुळशीच्या शेतीपासून मोठा नफा मिळत असल्याने कर्जत तालुक्यातील तरुण शेतकरी तुळशीच्या शेतीकडे प्रभावित होत आहे. बेडीसगाव या आदिवासी भागानंतर आता नेरळ परिसरात तुळशीची शेती हिरवीगार झालेली पाहावयास मिळत असून ही शेती सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे.कर्जत तालुक्यात पारंपरिक भात शेतीबरोबर हिवाळ्यात वाल, तूर, हरभरा अशी रब्बी पिके घेतली जातात. अनेक भागात भात कापणीनंतर शेतात हरभरा, तूर, वालाचे पीक घेतात, यावर्षी ही शेती मोठ्या प्रमाणात फुलली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून नेरळ परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी औषधी शेती म्हणजेच तुळशीच्या शेतीकडे वळला आहे. कृष्ण तुळस आणि राम तुळस असे तुळशीचे प्रकार असल्याचे शेतकरी सांगतात. उल्हासनदीच्या पाण्यावर ही शेती बहरलेली दिसत आहे. अनेक एकर शेतीमध्ये तुळशीची शेती केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तुळस ही औषधी वनस्पती असल्याने अनेक उपयोगासाठी वापरली जात आहे. त्यापासून मोठे उत्पन्न मिळत असल्याने तरु ण या शेतीकडे वळले आहेत.औषधी गुणधर्म असलेली वनस्पती तुळस ही घरोघरी आढळते. तशी तिची पूजा देखील घरोघरी केली जाते. मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीला सांैदर्यप्रसाधने तसेच औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांना याची आवश्यकता भासत असल्याने तुळशीला मागणी वाढत आहे. ही मागणी लक्षात घेऊन तुळशीची शेती बहरत आहे. अगदी कमी खर्चात तुळशीची शेती होत असल्याने यात नुकसानीची भीती जवळजवळ यात नसल्याचे शेतकºयांनी सांगितले. शेतात तयार झालेल्या तुळशीच्या जुड्या करून दादर, कल्याण हा या मोठ्या फुलांच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवत असतात. हार, पूजा व अनेक औषधी वस्तू बनविण्यासाठी तुळशीचा उपयोग केला जात असल्याचे शेतकºयांनी सांगितले.औषधी वनस्पतींना मागणी- तरु ण शेतकरीकर्जत तालुका हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध होता. मात्र हळूहळू अवकाळी पाऊस यात भातशेतीची होणारे नुकसान यामुळे शेतकरी आणि शेती कमी होत होती. मात्र आता पारंपरिक शेतीला छेद देत शेतकरी आणि त्यातल्या त्याततरु ण औषधी शेतीकडे वळत आहेत.तुळस, कोरफड आदी औषधी शेती सध्या कर्जत तालुक्यात होत आहे. जर याकडे शासनाने लक्ष दिले तर शतावरीसाख्या अनेक औषधी गुणधर्म व मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वनस्पतीची शेतीसुद्धा बहरू शकते, असे मत तरु ण शेतकरी व्यक्त करत आहेत.तुळशीची शेती करण्याची पद्धतशेतामध्ये पाटीदार पद्धत करून त्यामध्ये तुळशीचे बियाणे टाकले जाते. अर्धा एकर शेतीला साधारण दोन हजार रु पये खर्च येतो. पाटीदार वाटिका करून त्यात पाणी सोडले जाते. या शेतीला शेणखत वापरले जाते. तीन महिन्यात ही तुळस तयार होते.तुळशीची शेती ही अतिशय सोपी पद्धत आहे. पाटीदार पद्धतीने ही शेती केली जात असून तीन महिन्यात ही शेती तयार होते. तुळशीचे तीन प्रकार आहेत. ही औषधी वनस्पती असून मोठ्या प्रमाणात तुळशीची मागणी आहे. फुलांच्या बाजारात दादर, कल्याण बाजारपेठेत या तुळशीला मोठी मागणी आहे. यापासून मोठा नफा मिळत आहे.- यशवंत भवारे,कृषिनिष्ठ शेतकरी,दहीवली

टॅग्स :Raigadरायगडagricultureशेती