कांता हाबळे, नेरळगेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. मात्र कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शासनाने जमावबंदी लागू केल्याने या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाइल कॅमेऱ्यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्रं काही क्षणांत सोशल नेटवर्किं गवर सेल्फीच्या स्वरूपात अपलोड होतात व तितक्याच लाइक्स अन् पोस्ट शेअर केल्या जातात व पर्यटकांचे एकदा तरी जाऊ या, म्हणत प्लॅन्स ठरले जातात. याआधी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगरकपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी होते. यामुळे येथील आषाणे-कोषाणे, कोंदीवडे, खांडसमार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, बेकरे येथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंद झाली. सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण असून, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. या जमाव बंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे.नेरळ, कशेळे, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळतो. सोलनपाडा तसेच इतर धरणांवर गर्दी कमी झाल्याने मद्य विक्र ीवर देखील परिणाम झाला आहे. येथील खासगी वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा खूप फायदा होत होता. पावसाळ्याच्या तीन -चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगतात, मात्र या बंदीचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे या चालकांनी सांगितले. नेरळ व कशेळे येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहनचालक नाखूश आहेत. खासगी भाडे मारून दिवसागणिक २,५०० ते ३,००० एवढी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १,००० रु पये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
कर्जतचा पर्यटन व्यवसाय धोक्यात
By admin | Published: July 25, 2016 3:02 AM