शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

कर्जतमध्ये कच-याचे १६ प्रकारांमध्ये केले वर्गीकरण, नगरपरिषदेचे एक पाऊल पुढे, नागरिकांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 2:12 AM

नागरिकांनी कायमस्वरूपी आपल्या घरातील कच-याचे वर्गीकरण करावे यासाठी कर्जत नगरपरिषद आक्रमक झाली आहे. नगरपरिषदेने नागरिकांकडून कायमस्वरूपी कच-याचे वर्गीकरण करण्याची सवय व्हावी यासाठी अन्य नगरपरिषदांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे.

- संजय गायकवाडकर्जत : नागरिकांनी कायमस्वरूपी आपल्या घरातील कचºयाचे वर्गीकरण करावे यासाठी कर्जत नगरपरिषद आक्रमक झाली आहे. नगरपरिषदेने नागरिकांकडून कायमस्वरूपी कचºयाचे वर्गीकरण करण्याची सवय व्हावी यासाठी अन्य नगरपरिषदांच्या तुलनेत एक पाऊल पुढे टाकले आहे. कोणता कचरा कोणत्या दिवशी घंटागाडीत टाकताना घरातून बाहेर पडला पाहिजे याची माहिती देणारे स्टीकर घरोघरी लावले आहेत.कर्जत नगरपरिषद गेल्या काही वर्षांत कात टाकत असल्याचे दिसून येत आहे. कारण आरसीसी काँक्र ीटचे प्रशस्त रस्ते यामुळे कर्जत शहराचे रूप पालटले आहे. त्याचा परिणाम मागील अनेक वर्षे बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष अशा पडीक जागांवर आहे. त्यामुळे बदलाच्या संक्र मणात असलेल्या अशा शहरातील नागरिकांना शहराच्या नियोजनाचा भाग होऊन त्यांना एक सवय लागावी यासाठी नगरपरिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. राज्यात आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून नाव कमावलेले रामदास कोकरे यांनी कर्जतची जबाबदारी स्वीकारली आहे. कोकरे यांची सर्व जनतेला, पदाधिकाºयांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी सिंधुदुर्गमधून वेंगुर्लाप्रमाणे कर्जतमध्ये यशस्वी झाल्यास मुंबईचे उपनगर बनत असलेले कर्जतच्या प्रेमात पडतील, असा विश्वास नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांनी व्यक्त के लाआहे.कर्जत शहरातील कचरा डेपोत आतापर्यंत केवळ दोन प्रकारे कचरा संकलित केला जात होता. त्यामुळे त्या कचºयावर विघटन करताना कचरा डेपोमधील यंत्रणेत कायम बिघाड होत असे. आता तब्बल १६ प्रकारे कचºयाचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक दिवशी ओला, सुका, डायपर, सॅनिटरी नॅपकीन यांचे एकत्रित संकलन दररोज करण्यास सुरु वात झाली आहे. त्याशिवाय आठवड्यात सहा दिवस नागरिकांनी कोणत्या स्वरूपाचा कचरा कोणत्या दिवशी कचरा कुंडीत टाकला पाहिजे आणि तो घंटागाडीत पडला पाहिजे याचे नियोजन आरोग्य आणि स्वच्छता विभागाने केले आहे. मात्र कचºयाचे वर्गीकरण करताना एखाद्या नागरिकाने मिश्र स्थितीत कचरा घंटागाडीत टाकला नाही तर त्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई नगरपरिषद प्रशासनाने करण्यास सुरु वात केली आहे. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्लास्टिक पिशवीमध्ये भरून ठेवलेला कचरा न स्वीकारण्याचे धोरण कर्जत नगरपरिषदेने स्वीकारले आहे. त्यातून प्लास्टिक बंदीकडे शहराची वाटचाल सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.कचरा डेपोमध्ये विघटन होणे जाणार सोपेकचºयाची विल्हेवाट लावताना कचरा वर्गीकरण केलेल्या स्वरूपात कचरा डेपोमध्ये पोहोचल्यास विघटन होणे सोपे जाईल आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमावलीनुसार शहराचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी त्याचे योगदान मोठे ठरेल. त्याचवेळी नगरपरिषद कर्मचाºयांशी संबंधित असलेल्या बाबीबद्दल देखील ठोस भूमिका घेतली आहे.त्यात मृत जनावरे, पाळीव प्राणी यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्या प्राण्यांच्या मालकांची राहील असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच बांधकाम करताना निर्माण होणाºया कचºयाचे खड्ड्यात विघटन करण्याचे बंधन घालण्यात आले असून शहरात या नियमांचे पालन करताना कोणी दिसले नाही तर त्यांच्यावर कारवाई करायला प्रशासन कोणाचाही विचार करीत नाही.कर्जत शहरात होत असलेले कचºयाचे वर्गीकरणदररोजओला कचरा, सॅनिटरी नॅपकीन, डायपर, किचन वेस्ट.सोमवारप्लास्टिक आणि प्लास्टिक बाटल्या.मंगळवारकाच, ट्यूबलाईट, काचेच्या बाटल्या.बुधवारपुठ्ठा, कागद, कापड.गुरु वारइलेक्ट्रॉनिक वेस्ट.शुक्र वाररबर, टायर.शनिवारधातू, थर्माकोलशहरातील कचरा वेळेत उचलला जावा, शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे, नागरिकांना कचºयाबद्दल अनास्था वाटू नये यासाठी आम्ही नियोजन केले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कचरा, प्लास्टिक याबाबत अंमलबजावणी करताना कुठेही कोणीही हस्तक्षेप करीत नाही, त्यामुळे कर्जत शहर नक्कीच बदल स्वीकारत असल्याचे म्हणावे लागेल. हे सर्व केवळ स्वच्छ सर्वेक्षण अभियान आहे म्हणून नाही तर शहराला त्याची कायमस्वरूपी सवय व्हावी असा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे.- रामदास कोकरे, मुख्याधिकारी

टॅग्स :Raigadरायगड