कर्नाळा अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 11:24 PM2020-11-11T23:24:20+5:302020-11-11T23:24:43+5:30

पर्यटकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना

Karnala Sanctuary reopens for tourist after seven months | कर्नाळा अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

कर्नाळा अभयारण्य सात महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

Next

पनवेल: कोविड-19 च्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सात महिन्यापासून बंद असलेले पर्यटन अभयारण्य पर्यटकांसाठी सुरु करण्यात आले आहे. दि.12 नोव्हेंबर पासून अटी शर्तीचे पालन करून पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे.

महाराष्ट्रातील अभयारण्य टप्प्या टप्प्याने शासनाच्या निर्देशानुसार पर्यटकांसाठी खुले करण्यात येत आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनुसार पर्यटकांनी घ्यायची खबरदारी व उपाययोजनेच्या हेतून त्यांचे नियम व अटीशर्तीचे पालन करून अभयारण्य दि. 12 पासुन सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी पी चव्हाण यांनी दिली.अभयारण्यामध्ये इतर पायवाटा या बंद करण्यात येत असुन फक्त कर्नाळा किल्ल्याकडे जाणारी पायवाट ही पर्यटकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुढील परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने इतर पायवाटा सुरू करण्यात येतील व बचतगट दि. 1 पासुन  सुरू करण्यात येतील याची पर्यटकांनी नोंद घ्यावी अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: Karnala Sanctuary reopens for tourist after seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.