दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरपासून सुरू होणाऱ्या कशेडी घाटात पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर एका अवघड चढणीवर दोन मोठे तडे गेले आहेत. मध्य भागातील ६० ते ७० फूट रस्त्याचा संपूर्ण भाग खचून गेला आहे. सध्या हा भाग कधीही कोसळून या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर हद्दीत १२ किमीचा कशेडी घाट म्हणून संपूर्ण चढ लागतो.सध्याच्या परिस्थितीत वाहनांसाठी धोकादायक स्थिती बनली आहे. जवळच असलेल्या महामार्ग वाहतूक शाखा व कशेडी पोलिसांनी पोलादपूरच्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या तहसीलदारांना पत्रव्यवहार केला आहे. तसेच महाडचे प्रांताधिकारी व पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली आहे. ठिकठिकाणचे महामार्ग पडलेले खड्डे तर नवीन महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे होणाºया अडचणी अशा परिस्थितीत या मार्गावरून वाहनांनी प्रवास करणे कठीण बनले आहे.दरवर्षी या घाटामध्ये एक ते दोन ठिकाणी रस्ता साधारण खचण्याची घटना घडत असते. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून मलमपट्टी लावत डागडुजी केली जाते. यंदा संपूर्ण कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलादपूरपासून ८ किमी अंतरावर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला कशेडी घाटात दोन मोठे तडे गेले आहेत आणि दोन तड्यांच्या जवळपास ६० ते ७० फुटांच्या मधल्या भागात महामार्गच खचला आहे.पावसामुळे यात तड्यांमध्ये पाणी झिरपून महामार्गाचा हा रस्ता कधीही खाली खोल दरीत कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून याच रस्त्यावर दरदिवशी हजारो वाहने कोकणच्या तळकोकणात जातात. तर कोकणातून मुंबई दिशेला ये-जा करत यामधून हजारो प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या वेळेत याच मार्गाने शेकडो प्रवासी बसेसची वर्दळ असते.खचलेल्या भागामध्ये आजूबाजूला कोणतेही गाव नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे-झुडूपे असल्याने रात्रीच्या वेळी वाहनांच्या लाइटच्या उजेडाशिवाय काही नसते. जी दुर्घटना महाड सावित्री पुलावर घडली त्याच पद्धतीत याही ठिकाणी त्याची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. अशा परिस्थितीत देखील महामार्ग बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. खबरदारी म्हणून अद्याप या विभागामार्फत कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. या खचलेल्या भागामध्ये एखादे वाहन आल्यानंतर त्या ठिकाणी वाहनाला जम्प घेत निघून जावे लागते. तर हा भाग सरळसरळ उतारावरच असल्याने नवी वाहन चालकांना या ठिकाणचा अंदाज मिळत नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते. तरी या रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.होणाºया अपघाताला जबाबदार कोण?महाड तालुक्यात २ आॅगस्ट २०१६ मध्ये एक मोठी सावित्री पूल दुर्घटना घडली होती. त्या ठिकाणी जवळच असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे इतरांचे प्राण वाचले. मात्र, या कशेडी घाटामध्ये खचलेल्या ठिकाणापासून आजूबाजूच्या परिसरात घनदाट जंगलाशिवाय काहीच नाही. अशा वेळी जर रात्रीच्या वेळेस हा भाग खचून खाली क ोसळला तर कोकणातून या ठिकाणाहून वेगातून घाट उतरणारी वाहने सरळसरळ खोल दरीत कोसळू शकतील. अशी कोणतीच घटना होण्यापूर्वीच खबरदारीची पावले उचलणे गरजेचे आहे.सध्या या कशेडी घाट खचलेल्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. दिवसा देखील जोपर्यंत वाहनचालक समोर पोहोचत नाही, तोपर्यंत खचलेला भाग लक्षात येत नाही. मात्र, रात्रीच्या वेळी तर काहीच दिसत नाही.आजही काही वाहक वाहने या ठिकाणाहून वेगाने घेऊन जात आहे. मात्र, रात्रीची खबरदारी म्हणून या ठिकाणी रेडियममध्ये बोर्ड किंवा सोलर सिग्नल बसवणे, तसेच खचत असलेल्या भागात तात्पुरते बॅरिगेट बसवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी या भागाची गणपतीपूर्वी डागडुजी करणे गरजेचे आहे. सणादरम्यान याच भागातून हजारो प्रवासी कोकणात जातात.कशेडी घाट ज्या ठिकाणी तडे जाऊन खचलेला आहे ते ठिकाण अत्यंत धोकादायक आहे. या संदर्भात महामार्ग वाहतूक शाखा पोलीस कशेडीमार्फत राष्टÑीय महामार्ग विभाग आणि पोलादपूर तहसीलदार यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून, महाडचे प्रांताधिकारी आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना फोनद्वारे कळविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून महामार्ग वाहतूक शाखेकडून बॅरिगेट लावण्यात आले आहेत.- एम. ए. गमरे,सहायक पोलीस उपनिरीक्षक,वाहतूक पोलीस शाखा, कशेडीतातडीने दखल घ्यावीसध्याच्या परिस्थितीत कशेडी घाटातील खचलेला भाग हा अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी राष्टÑीय महामार्ग हा कोकणवासीयांचा एकमेव जवळचा मार्ग आहे.अशा परिस्थितीत या मार्गाला कोणती मोठी दुर्घटना होऊ नये, प्रवाशांचा जीव धोक्यात येण्यापूर्वीच याची खबरदारी घेण्यात यावी, यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राष्टÑीय महामार्ग विभाग यांनी याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
कशेडी घाट प्रवाशांसाठी धोकादायक; ६० ते ७० फूट रस्ता खचला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 1:37 AM