कर्जत : शासनाने आदिम जमात असलेल्या कातकरी समाजाच्या उत्थानासाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याचा भाग म्हणून सरकारी अधिकारी कातकरी वाडीमध्ये पोहोचत आहेत. सरकारी अधिकारी आपली कोणत्याही कागदावर सही घेतात आणि भलते-सलते घडते, या भीतीने लांब उभे राहून मजा बघणारे कातकरी लोक आणि त्यामुळे काही वेळ परेशान झालेले कर्जतचे तहसीलदार. मात्र, त्यांची खरी अडचण समजून तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. यामुळे कातकरी लोक जवळ येऊ लागले.नांगुर्ले कातकरीवाडी ही कर्जत-खोपोली रस्त्यावर असून, काहीशी दुर्गम भागात असलेली ही वाडी पळसदरी ग्रामपंचायतमध्ये येते. काहीसे मागासपण असलेल्या या कातकरीवाडीतील लोकांच्या अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. तरीदेखील येथील कातकरी समाजाला सरकारच्या भूमिकेवर विश्वास नाही. त्याचे एक कारण म्हणजे, येथील कातकरी लोकांना प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी झगडावे लागले आहे. आता राज्य सरकार कातकरी समाजाच्या उत्थानासाठी सरसावले असून, या आदिम जमातीच्या उत्थानासाठी खुद्द राज्यपालांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या कातकरी उत्थान कार्यक्र माला येथील लोकांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २४ आॅगस्ट रोजी गणेश उत्सवाची तयारी करीत असलेल्या आदिवासी कातकरी लोकांना सुखद धक्का तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिला. ते स्वत: पावसामुळे वाडीत जाणारी पायवाट निसरडी झालेली असताना देखील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या लवाजमा घेऊन पोहोचले. या वाडीत यापूर्वीपासून कातकरी समाजाच्या उत्थानासाठी काम करीत असलेले दिशा केंद्र या संघटनेचे कार्यकर्ते सोबत होते. त्यांनी कातकरी समूहाचा बेसलाइन सर्व्हे सुरू केला. मात्र, नांगुर्ले कातकरीवाडीत काही लोक सर्व्हे करण्यासाठी जात असलेल्या कर्मचाºयांना जवळ करीत नव्हते, तर काही कोणतीही माहिती सांगत नव्हते. त्यामुळे काहीसे परेशान झालेल्या तहसील कार्यालयातील कर्मचाºयांनी तेथील समाजमंदिरात बसलेल्या तहसीलदारांना त्याची माहिती दिली. तहसीलदार कोष्टी हे प्रत्येक घरात जाऊन त्यांना कातकरी उत्थान कार्यक्र माचे महत्त्व पटवून देत होते. तुम्ही सांगितले तर सरकारला वाडीत रस्ता नाही, वीज नाही, शाळा नाही, अंगणवाडी नाही, रेशन कार्डवर नावे नाहीत, रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही, याची माहिती मिळेल. तरीदेखील कातकरी लोकांची रेशन कार्डसंबंधी होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन आपण एक दिवसाचा कॅम्प लावून वाडीतच रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
कर्जत तालुक्यात ‘कातकरी उत्थान’ कार्यक्र माला सुरु वात, कर्जत तहसीलदारांचा आॅन दि स्पॉट निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:31 AM