‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:42 AM2017-08-18T02:42:30+5:302017-08-18T02:42:32+5:30
कर्जत तालुक्यात आदिवासी कातकरी या जमातीच्या विकासासाठी राबवायच्या उपक्र माच्या अनुषंगाने ‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नेरळ : महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कर्जत तालुक्यात आदिवासी कातकरी या जमातीच्या विकासासाठी राबवायच्या उपक्र माच्या अनुषंगाने ‘कातकरी उत्थान अभियान’ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तालुक्याच्या पातळीवर आदिवासीसाठी काम करणाºया वेगवेगळ्या संस्था संघटनांची यासाठी मदत घेऊन हे अभियान व्यापक व यशस्वी राबविण्याचा मानस कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी व्यक्त के ला. यामुळे लवकरच कातकरी समाजात आमूलाग्र बदल होऊन ते कात टाकतील, अशी आशा व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के इतकी लोकसंख्या आदिवासी समूहाची असून, महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी या आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत. यापैकी कातकरी ही जमात भारतीय संविधानाच्या सूची-पाचनुसार आदिम जमात म्हणून घोषित झाली आहे. या जमातीच्या उन्नतीसाठी आदिवासी विकास विभागासह सर्वच प्रशासकीय विभागांना वेगवेगळे उपक्रम राबविण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या आहेत. त्यानुसारच महसूल विभागीय आयुक्त कोकण कार्यालय यांच्यामार्फत आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत कातकरी जमातीचे विविध मुद्दे आणि घटकांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात येऊन आॅक्टोबर, नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या समस्येच्या सोडवणुकीसाठी वेगवेगळे कॅम्प आयोजित करणे. नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत कातक ºयांच्या रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमास प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची प्रवाही अंमलबजावणी करणे, असा कालबद्ध कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाºयांची मार्गदर्शन सभा शेळके सभागृहामध्ये नुकतीच घेण्यात आली. १८ आॅगस्ट रोजी तालुक्यातील आदिवासी समाजासाठी काम करणाºया संस्था-संघटनांची दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये बैठक आयोजित केली. कातकरी सर्वेक्षणामध्ये प्रशासनासोबत संघटनांच्या कार्यकर्त्यांची मदत घेण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
>विविध शिबिरांचे आयोजन करणार
वनहक्क कायदा अंमलबजावणी, घराखालील जागेचा प्रश्न, शिक्षण, रोजगार, रेशन, पेन्शन, जातीचे दाखले, वयोवृद्धांचे दाखले आदी विषयांवर या सभेत चर्चा केली जाणार आहे. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत परिपूर्ण सर्व्हे करून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोग्य तपासणी शिबिरे, जात प्रमाणपत्रे वाटप शिबिरे, घरपोच धान्य योजना, रेशन कार्ड वाटप शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
आदिवासी कातकरी बांधवांकडून माहिती गोळा करताना प्रत्येक कर्मचाºयाने सौजन्याने वागून माहिती गोळा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
अशा प्रकारे कातकरी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण या समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
>प्रशासनाला सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत मिळाल्यामुळे वेळेत व परिपूर्ण सर्व्हे होईल, याबद्दल मला खात्री आहे. सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा प्रत्येक गावाशी, आदिवासीवाडीशी प्रत्यक्ष संपर्क असतो, तसेच या कार्यकर्त्यांच्या कामावर लोकांचाही विश्वास असतो. यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपआपल्या पातळीवर या अभियानात सहभाग घेऊन कातकारी उत्थान अभियानात सहकार्य करावे.
- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत