साजगाव-आदोशी रस्त्यावर खड्डे
By admin | Published: June 29, 2015 03:57 AM2015-06-29T03:57:25+5:302015-06-29T03:57:25+5:30
लाखो रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या साजगाव-आदोशी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वावोशी : लाखो रुपये खर्च करून काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेल्या साजगाव-आदोशी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
खालापूर तालुक्यात साजगाव-आदोशी हा औद्योगिकरणातील महत्त्वपूर्ण रस्ता समजला जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर दरवर्षी डागडुजीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत असतात. मात्र परिस्थिती जैसे थे. मागील पाच वर्षांतील या रस्त्यावरील खर्च बघता अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यासंदर्भात कोकण आयुक्तांना पत्र देणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष खवळे यांनी सांगितले आहे. सदर साजगाव-आदोशी रस्ता हा साजगाव-ताकई एक किमीपर्यंत खोपोली नगरपरिषद हद्दीत आहे व याच रस्त्यामध्ये सर्वाधिक खड्डे असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी कांबळे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)