सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील खैरे धरणाची जलशुद्धीकरण यंत्रणा नादुरुस्त झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून धरणाच्या दुरुस्तीकरिता निधीच उपलब्ध झालेला नाही. यामुळे पाण्यावर प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याने परिसरात ऐन पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा झाला. वारंवार मागणी करूनही पैसे उपलब्ध होत नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
महाड तालुक्यातील खाडीपट्टा भागात खैरे गावाजवळ येथील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता धरण बांधण्यात आले. खाडी प्रदूषण आणि जमीन प्रदूषणाचे कारण पुढे करत स्थानिकांनी शेतीकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शेती ओसाड पडत गेली. धरणाच्या पाण्याचा वापर केवळ आता पिण्याच्या पाण्यासाठी केला जात आहे. या धरणाच्या माध्यमातून ऐन पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा झाल्याची तक्र ार स्थानिक नागरिकांनी केली. ऐन पावसाळ्यात हे गढूळ पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला होता.धरणाच्या शेजारीच असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेत बिघाड असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सांगितले. यातील काही पंप नादुरुस्त झाले आहेत. यामुळे आरोग्याची समस्या उदभवण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात येत आहे.खैरे गावाच्या जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हा प्रकल्प उभा केला असून सन २00९ मध्ये हा प्रकल्प रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आला. या प्रकल्पाचा वापर सध्या केवळ पिण्याच्या पाण्याकरिता होत आहे.परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांची तहान हा प्रकल्प भागवत असून यामध्ये गोमेंडी, वराठी, चिंभावे, चिंभावे सुतारकोंड, चिंभावे मोहल्ला, बेबलघर, तेलंगे, आदीस्ते, खैरे, रोहन, जुई, कुंबळे, रावढळ, कोसबी, लोअर तुडील, वामने या गावांचा समावेश आहे. जवळपास १०,३१४ लोकसंख्येला हा पाणीपुरवठा होत आहे.गेल्या चार वर्षांत दुरुस्ती निधी आलेला नाही. याकरिता खासगी ठेका पद्धतीने काम केले जात असून प्रतिवर्षाला किमान ४० लाख रुपयांचे टेंडर मंजूर होते. यामध्ये या ठिकाणी काम करणारे कामगार, लागणारे क्लोरीन, तुरटी यावर खर्च केला जातो. वर्षाला ४० लाख रुपये खर्च होत असताना दुरुस्ती का होत नाही याकरिता दुरूस्ती निधीची वाट का पाहावी लागते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पाणीपट्टी थकबाकीच्परिसरातील २२ गावे आणि २९ वाड्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा कायम होत असतो. यामुळे ग्रामस्थांकडून प्रतिघर १०० रुपये तर प्रति स्टँड पोस्टमागे ९० रुपये कर आकारणी केली जाते.च्ही पाणीपट्टी वसूल करण्याकरिता खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात सुमारे ८२ लाख रुपये थकबाकी येणे आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता किंवा प्रकल्पाच्या दुरुस्ती निधीकरिता पाणीपट्टी वसुली देखील महत्त्वाची आहे.च्केवळ क्लोरिनेशन, तुरटी प्रक्रि या करूनच पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पावसाळ्यात गढूळ पाणी ग्रामस्थांना प्यावे लागले. जलशुद्धीकरण प्रक्रियेच्या बाजूला असलेल्या एका टाकीला गळती असल्याने बाजूचे पाणी टाकी रिकामी झाल्यानंतर आत ओढले जाते.च्फिल्ट्रेशन, स्प्रिंकलर, पंपिंग, एरीएशन, सँड फिल्टर, क्लोरीनेशन, तुरटी या प्रक्रि येतून गेल्यानंतर हा पाणीपुरवठा केला जातो. गेल्या चार वर्षांपासून यातील काही पंप, सँड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे.खैरे धरणातून २२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या चार वर्षांत दुरुस्ती निधी प्राप्त झालेला नाही. येथील सँड फिल्टरेशन प्रक्रि या बंद आहे. शिवाय थकबाकी देखील मोठ्या प्रमाणात वसूल होणे आहे.- जे.एन.पाटील, उपअभियंता महाड१0,३१४लोकसंख्येला धरणातून होतो पाणीपुरवठा