“इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 11:58 PM2023-07-20T23:58:19+5:302023-07-20T23:59:09+5:30

Raigad Irshalwadi Landslide Incident: गावाजवळच इर्शाळवाडी स्थलांतराचा प्रस्तावावर काम सुरू केले होते. वर्षानुवर्षे तिथेच राहत असल्यामुळे ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते.

khalapur irshalwadi landslide incident village sarpanch ritu thombre told we already had given new proposal of houses to villagers | “इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

“इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित होण्यास सांगितले होते, जागाही ठरवली होती; पण...”

googlenewsNext

Raigad Irshalwadi Landslide Incident:रायगडमध्ये इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावावर दरड कोसळली. यामध्ये ४० हून अधिक घरे गाडली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला. एनडीआरएफचे जवान काम करत आहेत. परंतू, पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत ९८ जणांना वाचविण्यात आले आहे. मात्र, यातच आता इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांना यापूर्वीच स्थलांतरित होण्यास सांगितले होते. नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती, अशी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी गावात रात्रीच्या अंधारात गावकरी झोपेत असताना घरांवर दरड कोसळली. गावातील १७ ते १८ घरे या दरडीखाली दबली गेली. हा परिसर शासनाच्या दरडींच्या धोक्याची गावातील यादीतही नव्हता. अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, कोकणात पडणारा दरवर्षी मुसळधार पाऊस आणि डोंफरच्या पायथ्याशी असलेले गाव अशी सगळीच धोकादायक परिस्थिती लक्षात घेता लक्षात घेता यापूर्वीच ग्रामस्थांना तेथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते अशी माहिती इर्शाळवाडीच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी दिली आहे. 

नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच केली होती

नवीन जागेसाठीचा प्रस्ताव करूया अशी विनंती यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आली होती. आमच्याच गावाजवळ शंभर एकर एक परिसर आहे. त्या ठिकाणी आपण या इर्शाळवाडीला नवीन घरांचा स्थलांतराचा प्रस्तावही तयार करण्याचे काम सुरू केले होते. पण, या ठिकाणी अशी काही घटना घडेल याची सुतराम कल्पना आणि शक्यता तिथल्या परंपरागत राहायला असेलल्या ग्रामस्थांनाच नव्हे तर आम्हाला नव्हती, असेही रितू ठोंबरे म्हणाल्या. तसेच परंपरागत घरे तिथे असल्याने ग्रामस्थ तिथून हलण्यास राजी नव्हते. मात्र, आत्ताची नवीन पिढी आहे ती काम धंदानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर राहते आहे. रात्री घडलेली घटना ही अक्षरशः मन सुन्न करणारी अशीच आहे. मात्र, या सगळ्या मोठ्या प्रसंगांमध्ये आम्ही त्यांच्यासोबतच कायम आहोत त्यांना जी काही मदत लागेल ती मदत ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. 

दरम्यान, या किल्ल्याच्या पायथ्याशी जे छोटी दुकानाला लावतात आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालतो, त्यांच्यासाठी आम्ही शासनाच्या टीबीडी योजनेत प्रस्ताव केले असून या योजनेतून त्याला दरवर्षी मदत दिली जाते. बुधवारीच आपण या परिसरात जाऊन आलो होतो. हा सगळा भाग अतिशय उंचावर आहे आणि मुख्य गावापासूनही लांब आहे त्यामुळे आपण त्या सगळ्याना गावाजवळ वास्तव्यासाठी येण्याची विनंती यापूर्वीच केली होती, असेही त्यांनी सांगितले. 


 

Web Title: khalapur irshalwadi landslide incident village sarpanch ritu thombre told we already had given new proposal of houses to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.