खांदाड, खांदाड आदिवासीवाडीत मिळणार घरपोहोच रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:53 AM2019-12-30T00:53:37+5:302019-12-30T00:53:40+5:30

नीलेश थोरे यांचा गरिबांना दिलासा; खरेदी-विक्री संघाचा रेशनकार्डधारक उपभोक्ता मेळावा

Khandad, Khandad Tribal Wadi will get house ration | खांदाड, खांदाड आदिवासीवाडीत मिळणार घरपोहोच रेशन

खांदाड, खांदाड आदिवासीवाडीत मिळणार घरपोहोच रेशन

Next

माणगाव : आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला रेशनचे धान्य मिळवण्याकरिता अनेक वेळा रेशनदुकानाचे उंबरे झिजवावे लागत होते. कधी कधी रेशन मिळत नाही, कधी मिळाले तर कमी मिळते, कधी कधी महिनाभर फेऱ्या मारूनही रेशन न मिळाल्याने हताश होऊन परतावे लागते; परंतु माणगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या रेशनकार्डधारक उपभोक्ता मेळाव्यात सभापती नीलेश थोरे यांनी १ जानेवारी २०२०पासून माणगाव शहरातील खांदाड, खांदाड आदिवासीवाडी आणि सिद्धीनगरमधील रेशनकार्डधारकांना घरपोहोच रेशनधान्य प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणार असल्याचे जाहीर के ले. हा अनोखा निर्णय जाहीर करून थोरे यांनी उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

माणगाव शहरातील खांदाड येथील मराठी शाळेत रेशनकार्ड उपभोक्ता मेळावा पार पडला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना खरेदी-विक्री संघाचे सभापती नीलेश थोरे यांनी आजवर रेशनपुरवठ्यात तांत्रिक बाबींच्या अडचणीमुळे गोरगरीब व आदिवासी, तसेच सर्वसामान्य जनता यांना अनेक वेळा रेशनधान्यापासून वंचित राहावे लागते; परंतु माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अधिपत्याखाली असणाºया रास्त भाव धान्य दुकानामधून जानेवारी २०२०पासून प्रत्येक उपभोक्त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनधान्य थेट घरपोहोच करण्याची योजना संघ जाहीर करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही परवानाधारक व्यक्ती अथवा संस्थेने यापूर्वी असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला नसून हा निर्णय केवळ माणगाव तालुका किंवा रायगड जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राकरिता आदर्श निर्माण करणारा आहे. ही योजना जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरही संचालक मंडळामध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

हा निर्णय जाहीर करताच उपस्थित सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असा निर्णय झालेला नसल्याने माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. या वेळी संघाचे उपसभापती संजय मालोरे, ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण अंबुर्ले, राजेश कासारे, बाबू बटवले, साक्षी येलकर, श्रद्धा मांजरे, नितीन वाघमारे, नथुराम मोरे, व्यवस्थापक समीर पोवार व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

सभापती नीलेश थोरे यांनी अधिक माहिती देताना १ ते ७ जानेवारीपर्यंत या काळात सर्व रेशनकार्डधारकांचे आवश्यक ते कागदपत्र आणि माहिती अपडेट केली जाईल. यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, फोटो, मोबाइल नंबर, निवडणूक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र लिंक केली जातील. बºयाच जणांचे आधार कार्ड लिंक केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना रेशनकार्ड मिळत नव्हते. त्यांनाही याचा लाभ मिळू शकणार आहे. जे रेशनकार्डधारक सध्या खांदाड, खांदाड आदिवासीवाडी व सिद्धीनगर येथे वास्तव्यास नाहीत. मात्र, माणगाव शहराच्या विविध भागात विखुरलेले आहेत, त्यांनाही लाभ मिळू शकणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

Web Title: Khandad, Khandad Tribal Wadi will get house ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.