खांडसई, कासारवाडी पाणीदार; लोकसहभागातून बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:11 AM2017-11-01T05:11:49+5:302017-11-01T05:12:00+5:30

सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.

Khansai, Kasarwadi cleaner; Bonded by people's participation | खांडसई, कासारवाडी पाणीदार; लोकसहभागातून बंधारे

खांडसई, कासारवाडी पाणीदार; लोकसहभागातून बंधारे

Next

पाली : सुधागड तालुक्यातील खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर नुकतेच बंधारे बांधण्यात आले. सरपंच उमेश यादव यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी लोकसहभागातून हे बंधारे बांधले आहेत. यामुळे येथील पाणीप्रश्न मार्गी लागून भूगर्भजलात वाढ होणार आहे.
खांडसई व कासारवाडी गावात वर्षानुवर्षे उन्हाळ्यात गंभीर पाणीटंचाई भेडसावते. यामुळे येथील जलस्रोत टिकवून भूगर्भजल वाढवावे ही कल्पना सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच उमेश यादव यांना सुचली. त्यानुसार त्यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मिळून खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर बंधारा बांधला.
या कामासाठी स्थानिक आदिवासींनी देखील मौलिक सहकार्य केले. पाणी अडविल्याने गावकºयांचा तसेच गुरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच भूजलभरणा वाढणार आहे. बंधारा बांधते वेळी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्य नथुराम चोरघे, शिपाई गणेश महाले, युवासेना पेण-सुधागड-रोहा विधानसभा समन्वयक आशिष यादव यांच्यासह गणेश सावंत, दीपक जाधव, अनंता साळस्कर, मोहन, किरण, माउली आदींसह ग्रामस्थ तसेच आदिवासीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रत्येकाने मोठ्या मेहनतीने बंधारा बांधण्याचे काम
केले.

ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवरील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना व संस्थांचे सहकार्य घेणार आहे. योग्य नियोजन व व्यवस्थापनाने हा प्रश्न नक्कीच मार्गी लागू शकतो. ग्रामस्थांनी एकत्र येवून केलेल्या या कामाबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार.
- उमेश गोविंद यादव, सरपंच, सिद्धेश्वर

Web Title: Khansai, Kasarwadi cleaner; Bonded by people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी